शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकारी योजनांना लोककलावंतांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 20:22 IST

नाशिक : शासनाने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहचविण्यासाठी शासन आता लोककलावंतांची मदत घेणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत समाजमाध्यमांचा सरकारकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी मात्र लोककलेचा आधार घेतला जाणार आहे.केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिल्यानंतर इतर अनेक राज्यांनी प्रगत माहिती युगातील साधनांचा अधिकाधिक वापर सुरू केला ...

ठळक मुद्देशासनाचा उपक्रम : शासनाकडून माहिती मिळविण्यास प्रारंभलोकसहभागासह जनजागृतीवर भर

नाशिक : शासनाने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहचविण्यासाठी शासन आता लोककलावंतांची मदत घेणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत समाजमाध्यमांचा सरकारकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी मात्र लोककलेचा आधार घेतला जाणार आहे.केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिल्यानंतर इतर अनेक राज्यांनी प्रगत माहिती युगातील साधनांचा अधिकाधिक वापर सुरू केला आहे. महाराष्टÑदेखील यात मागे नसून महाराष्टÑाने ‘मेक इन महाराष्टÑ’सारखा उपक्रम राबवून तंत्रज्ञानातील सहभाग वाढविला आहे. असे असताना राज्य सरकारला तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी तंत्रज्ञानाची कास सोडून परंपरागत लोककलेचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाकडून राबविण्यात आलेल्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचाव्यात आणि त्यांना या योजनांची माहिती मिळावी यासाठी शासनाने लोककलावंतांना साकडे घातले आहे. राज्यातील लोककलावंतांचा शोध सुरू करण्यात आला असून, यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर माहिती भरून देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील जनतेला त्यांच्याच भाषेत आणि कलेत योजनांची माहिती मिळाल्यास त्यांच्यात जागृती निर्माण होऊ शकेल, यास्तव शासनाने लोककलावंतांची फौज तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या कलावंतांचा शोध घेतला जात आहे. गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारूड आदी सादर करणाºया कलावंतांची माहिती घेतली जात आहे. शासनाने गावखेड्यात राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी या कलावंतांना योजनांवर कला सादर करण्यास सांगितले जाणार आहे. यासाठीचा मोबदलादेखील देण्यात येणार आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छतेसंदर्भातील अनेक उपक्रमांची माहिती आणि जनजागृती लोककलावंतांच्या माध्यमातून केली जाते. शिवाय आरोग्य संदर्भातील उपाययोजना आणि जनजागृतीसाठीदेखील लोककलावंतांची मदत घेतली जाते. याची आता व्याप्ती वाढविण्यात येणार असून, प्राथमिक सुविधांबरोबरच लोकसहभागासह जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र