शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दाढीचे पैसे मागितल्याच्या रागातून नाशिकमध्ये सलून व्यावसायिकास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:17 IST

नाशिक : सलून दुकानात दाढी केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी सलून व्यावसायिकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गंगापूर गावात घडली़ अक्षय जाधव, निखिल कटारे, निखिल भगवान जाधव व मन्या (पूृर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत़

ठळक मुद्देगंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : सलून दुकानात दाढी केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी सलून व्यावसायिकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गंगापूर गावात घडली़ अक्षय जाधव, निखिल कटारे, निखिल भगवान जाधव व मन्या (पूृर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर गावातील राजेश्वर इंगळे यांचे सलूनचे दुकान आहे़ रविवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास संशयित अक्षय जाधव हा आपले तीन मित्र निखिल कटारे, निखिल जाधव व मन्या यांच्यासमवेत दुकानात आला़ याठिकाणी अक्षय याने दाढी केल्यानंतर इंगळे यांनी दाढीचे पैसे मागितले असता अक्षय व त्याच्या मित्रांना राग आला़ त्यांनी सलून व्यावसायिक इंगळे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली तर यापैकी संशयित मन्या याने हातातील दगड डोके व पाठीवर मारून जबर दुखापत केली़ यानंतर आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली़

या प्रकरणी इंगळे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा