शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर बंदमुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचे रखडले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:37 IST

शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या वीस दिवसांपासून बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४४५ शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले तयार होऊ शकलेले नाही.

ठळक मुद्देशिक्षक अडचणीत : जिल्ह्यातील ५० टक्के शाळांना प्रतीक्षा गेल्या १० जानेवारीपासून सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड

नाशिक : शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या वीस दिवसांपासून बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४४५ शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले तयार होऊ शकलेले नाही. त्यामुळे शिक्षकांचे जानेवारीचे वेतन निघाले नसून सर्व्हर कधी सुरू होणार याबाबतची कोणतीही माहिती शिक्षण विभागाला नसल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत.शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी शिक्षण विभागाच्या आॅनलाईन प्रणालीवर वेतनाची माहिती अपलोड करावी लागते. या शालार्थ प्रणालीमध्ये शाळांना आपल्या शिक्षकांची वेतनबीले सादर करावी लागतात. मात्र गेल्या १० जानेवारीपासून सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले वेतनपथकाला सादर होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे हीच प्रणाली जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागात असून त्यावरच वेतनपथकाला माहिती भरावी लागत असल्याने त्यांच्याही कामाचा खोळंबा होऊन बसला आहे. जानेवारीच्या १ ते ९ तारखेपर्यंत ज्या शाळांनी माहिती पाठविली होती. त्यातील काही शाळांची वेतनबीले मंजूर होऊन शिक्षकांना पगार देखील झालेले आहेत. परंतु दुसºया टप्प्यातील वेतनाची माहितीच आॅनलाईन भरता येत नसल्याने शिक्षकांचे वेतन रखडले आहे.नाशिक जिल्ह्यात खासगी प्राथमिक अनुदानित शााळांची संख्या २२५ असून माध्यमिक अनुदानित शाळांची संख्या ७६४ इतकी आहे. या शाळांना आॅनलाईन पद्धतीने शिक्षकांचे वेतन काढावे लागते. सुमारे ५० टक्के शाळांनी आॅनलाईन माहिती भरली असून उर्वरित ५० टक्के शाळांची माहिती अद्यापही अपलोड होऊ शकलेली नाही. त्यामुळे जानेवारीतील वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात आता काही शिक्षक संघटनांकडून माहिती घेण्याचे काम सुरू असून या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांची  भेट घेणार असल्याचे समजते.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक