शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेशाद्वारे स्टेट बँकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 17:11 IST

नाशिक : बँकेतील लिपिकानेच बनावट धनादेश तयार करून तो खरा असल्याचे भासवून बँकेतून दीड लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॅनडा कॉर्नर शाखेत घडला आहे़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित नीलेश सीताराम कुलकर्णी (रा. आनंद कुंज नंबर 1, जीपी रोड, नाशिक) यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे संशयित बँकेतील लिपिक : न्यायालयाचे आदेशसरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : बँकेतील लिपिकानेच बनावट धनादेश तयार करून तो खरा असल्याचे भासवून बँकेतून दीड लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॅनडा कॉर्नर शाखेत घडला आहे़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित नीलेश सीताराम कुलकर्णी (रा. आनंद कुंज नंबर 1, जीपी रोड, नाशिक) यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

कॅनडा कॉर्नर येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतर्फे संजय रामचंद्र बागते (५९) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार दि. ६ नोव्हेंबर २०१२ ते दि. १९ जानेवारी २०१३ या कालावधीत संशयित कुलकर्णी हे कॅनडा कॉर्नर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत नोकरीला होते़ या कालावधीत त्यांनी बँकेचा बनावट धनादेश तयार केला व तो खरा असल्याचे भासवून बँकेतून १ लाख ५० हजार रुपये काढले़ मात्र, ही बाब बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आली़

बँक व्यवस्थापनाने पोलिसांत कुलकर्णीविरोधात तक्रार केली असता गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्याने जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल करण्यात आला होता़ या दाव्याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले़ त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी संशयित कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़

बँक आवारातील सीसीटीव्ही कॅमे-यांची चोरीस्टेट बँक आॅप इंडियाच्या भाद्रपद सेक्टरमधील अंबड शाखेच्या आवारातील एटीएम रुममधील मशीन व यूपीएसची नुकसान करून चोरट्यांनी या रुममधील सीसीटीव्ही कॅमेरा व एलइडी बल्ब असा पाच हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्री घडली़ या प्रकरणी राजेंद्र संदानशिव (रा.जगतापमळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकbankबँकCrimeगुन्हाPoliceपोलिस