नाशिकचे तापमान राज्यात नीचांकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:30 AM2019-01-08T01:30:23+5:302019-01-08T01:30:40+5:30

शहराचे किमान तापमान ९.७ तर कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत सरकले होते. त्यामुळे नाशिककरांना थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी (दि.७) शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली.

 Nashik's temperature is low in the state | नाशिकचे तापमान राज्यात नीचांकी

नाशिकचे तापमान राज्यात नीचांकी

Next

नाशिक : शहराचे किमान तापमान ९.७ तर कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत सरकले होते. त्यामुळे नाशिककरांना थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी (दि.७) शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली.  काश्मीर खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे तेथील तापमानाचा पारा उणे ४ ते उणे ११ अंशांपर्यंत घसरला आहे. गुलबर्गमध्ये उणे ११, पहेलगाममध्ये उणे १३.६ तर श्रीनगरमध्ये उणे चार अंशांपर्यंत किमान तापमान सोमवारी नोंदविले गेले. बर्फ वृष्टीचा थेट परिणाम पुन्हा उत्तर महाराष्टÑावर होऊ लागला असून, नाशिक गारठण्यास सुरुवात झाली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर-मध्य महराष्टÑात पुन्हा शीतलहर आली आहे. हवामान खात्याकडून दोन दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा शनिवारी देण्यात आला होता.

Web Title:  Nashik's temperature is low in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.