शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत नाशिकचे यश
By Admin | Updated: May 7, 2014 21:32 IST2014-05-07T20:35:31+5:302014-05-07T21:32:33+5:30
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत नाशिकचे यश
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये मुलांच्या गटातून रितेश देशमुख, तर मुलींच्या गटातून शरायू पाटील, रोशनी मुर्तडक यांनी सुवर्णपदक पटकावले.
मुलींची शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा आंध्र प्रदेशातील नंदी येथे संपन्न झाली, तर मुलांच्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा जालना येथे नुकत्याच पार पडल्या. या दोन्ही स्पर्धांमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. पदकप्राप्त खेळाडूंचा नाशिक फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, अशोक दुधारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. बाजीराव पेखळे, राजू शिंदे, मधुकर देशमुख, बाळासाहेब शिंदे आदि उपस्थित होते.
निकाल :
मुली : १७ वर्षांखालील गटात शरायू पाटील हिने इपी सांघिकमध्ये सुवर्ण, फॉईलमध्ये रौप्यपदक पटकावले. याच गटात रोशनी मुर्तडक हिने इपी सांघिक प्रकारात सुवर्ण पटकावले. १९ वर्षांखालील इपी सांघिकमध्ये अस्मिता दुधारे, श्वेता जाधव यांना कांस्य, तर १४ वर्षांखालील सायबर सांघिकमध्ये ईशा खैरनार हिने कांस्यपदक पटकावले.
मुले : १७ वर्षांखालील गटात रितेश देशमुख याने फॉईल सांघिकमध्ये सुवर्ण, दिग्विजय सोनवणे याने १९ वर्षांखालील गटाच्या सायबर वैयक्तिकमध्ये रौप्य व सांघिकमध्ये कांस्य, १४ वर्षांखालील रुत्विक शिंदे याने फॉईल सांघिकमध्ये रौप्य, फॉईल वैयक्तिक व इपी वैयक्तिकमध्ये कांस्यपदक पटकावले. सिद्धेश पाटील याने १४ वर्षांखालील इपी वैयक्तिकमध्ये कांस्य, आदित्य गोरे याने सायबर सांघिकमध्ये रौप्य व वैयक्तिकमध्ये कांस्य, तर धु्रव तोरणे याने सायबर सांघिकमध्ये रौप्यपदक पटकावले.