राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधवला सुवर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:35+5:302021-09-21T04:16:35+5:30
नाशिक : तेलंगणा राज्यातील वारंगलला सुरू झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेतील १०हजार मीटर प्रकारात नाशिकच्या संजीवनी जाधव हिने थेट सुवर्णपदकाला ...

राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधवला सुवर्ण !
नाशिक : तेलंगणा राज्यातील वारंगलला सुरू झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेतील १०हजार मीटर प्रकारात नाशिकच्या संजीवनी जाधव हिने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. संजीवनीने प्रतिस्पर्धी मुलीपेक्षा दीड मिनिटांहून कमी वेळ घेत अव्वल स्थान पटकावले.
वारंगलच्या या स्पर्धेत नाशिकच्या संजीवनीने यापूर्वी ५हजार मीटरच्या प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वीदेखील पदके मिळवलेली असल्याने संजीवनीला स्पर्धेच्या आधीपासूनच सुवर्णपदकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. स्पर्धेत प्रारंभापासून अखेरच्या टप्प्यापर्यंत संजीवनीने पहिल्या पाचातील घोडदौड कायम राखत अखेरच्या दोन लॅपमध्ये जोर लावून आगेकूच कायम राखली. त्यामुळेच अखेरच्या टप्प्यात आघाडी वाढवत नेऊन संजीवनीने ३४ मिनिटे २० सेकंद ०३ शतांश सेकंदात बाजी मारली. त्यानंतर व्दितीय स्थान पटकावलेल्या रेल्वेच्या कविता यादवला १० किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल ३५ मिनिटे ५७ सेकंद ४६ शतांश सेकंद इतका तर ज्योतीने तृतीय क्रमांकासाठी ३६ मिनिटे ३७ सेकंद ९० शतांश सेकंद इतका कालावधी लागला. नाशिकचे साई कोच विजेंद्रसिंह यांचे मार्गदर्शन लाभत असून ती नियमितपणे भोसला सैनिकी स्कूलच्या मैदानावर सराव करते.
फोटो
२०संजीवनी
200921\20nsk_48_20092021_13.jpg
संजीवनी जाधव