नाशिक : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी (दि. १३) मे रोजी रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. जिल्ह्याचा दहावीचा निकालात बारावीप्रमाणेच घसरण झाली असून, विभागाचा दहावीचा निकाल ९५.९० टक्के लागला आहे. नाशिक जिल्हा विभागात प्रथम असला तरी राज्यात मात्र तो पाचव्या क्रमांकावर गेला आहे.
विभागात नाशिक जिल्हा ९५.३८ टक्के प्रथम असून, दुसऱ्या क्रमांकावर धुळे (८७.१०), तिसऱ्या क्रमांकावर जळगाव (९३.९७), चौथ्या क्रमांकावर नंदुरबार (८८.१९) अशी क्रमवारी आहे. नाशिक जिल्ह्यातून १ लाख ९८ हजार ७०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख ९७ हजार १४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ८३ हजार ३०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी ९३.४ इतकी आहे. त्यातही मुलींनी उत्तीर्ण होण्यात आघाडी घेतली असून, ती ९६.९९ टक्के आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.९४ टक्के इतके आहे. यंदाही मुलींनी आघाडी घेतल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले असून तब्बल २७.४० टक्के शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ४ शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे.