नाशिकचा पारा पुन्हा
By Admin | Updated: April 15, 2017 18:22 IST2017-04-15T18:22:40+5:302017-04-15T18:22:40+5:30
नाशिकचा पारा पुन्हा

नाशिकचा पारा पुन्हा
ााशिक : शहराच्या कमाल तपमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, शहरात उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवला. तपमानाचा पारा चाळिशीकडे सरकला.
मार्च महिन्यात तपमानाचा पारा थेट ४०.३ अंशांपर्यंत सरकला होता. त्यामुळे यंदाचा उन्हाळा नाशिककरांना चांगलाच तापदायक ठरत आहे. हंगामातील सर्वाधिक ४०.३ इतक्या तपमानाचा उच्चांक नोंदविला गेला आहे. नाशिककरांना उष्म्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. चालू महिन्याच्या सुरुवातीपासून तपमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत होता; मात्र हळूहळू हा पारा ४०;१ अंशांच्या आसपास स्थिरावत गेला. यामुळे शहराच्या वातावरण उष्ण बनले आहे. एकूणच दुसरा आठवडा नाशिककरांना पुन्हा तापदायक ठरत आहे. नाशिककर घामाघूम झाले होते. दिवसभर नागरिकांकडून थंड पाण्याबरोबरच शीतपेय घेऊन तृष्णा भागवित उष्म्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न सुरू होता.