शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थ आराखडा पोहचला अकरा हजार कोटींवर; कामे अंतिम टप्प्यात

By suyog.joshi | Updated: December 13, 2023 10:23 IST

विकासकामांची जंत्री पाहता सिंहस्थ आराखडा अकरा हजार कोटींवर गेला.

नाशिक - महापालिकेकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळा विकासकामे आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून खर्चाचा आकडा अकरा हजार कोटींवर पोहचला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विविध विकासकामांसाठी भूसंपादनासाठीच चार ते पाच हजार कोटींची आवश्यकता आहे.

अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.१२) सर्व विभागप्रमुखांची आराखडा तयारी बाबत आढावा बैठक झाली.सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या विकासासाठी पर्वणी ठरतो.बारावर्षांचा शहराच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढतो. सन २०२७- २८ मध्ये कुंभमेळा होणार असून तयारीसाठी अवघे तीन वर्ष उरले आहे.पण मंत्रालय स्तरावरुन अद्याप तयारीबाबत उदासीनता दिसते. पण दुसरीकडे मनपा आयुक्तांच्या सूचनेनंतर सर्व विभागांनी स्वत:च्ता स्तरावर कुंभमेळा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

पहिल्या टप्प्यात हा आराखडा आठ हजार कोटींच्या घरात होता. पण अंतर्गत रिंगरोड, मिसिंग लिंक, जुन्या रिंगरोडचे रुदिकरण यासाठी भूसंपादन करावे लागणार असून त्यासाठी तीन हजार कोटींची गरज आहे. विकासकामांची जंत्री पाहता सिंहस्थ आराखडा अकरा हजार कोटींवर गेला. अतिरिक्त आयुक्तांनी सर्व विभागांना आराखड्यात कोणत्याही त्रुटी रहायला नको अशा सूचना दिल्या आहेत. लवकरच हा आराखडा आयुक्तांना सादर केला जाईल.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका