नाशिकच्या किकवी धरणाला मिळाली चाल, राज्य शासनाच्या नियमक मंडळाच्या बैठकीत निर्णय
By संजय पाठक | Updated: June 19, 2023 18:44 IST2023-06-19T18:36:40+5:302023-06-19T18:44:03+5:30
एक तपानंतर कार्यवाही सुरू होणार.

नाशिकच्या किकवी धरणाला मिळाली चाल, राज्य शासनाच्या नियमक मंडळाच्या बैठकीत निर्णय
नाशिक- शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रास्तावित करण्यात आलेल्या किकवी धरणाच्या कामाला राज्य शासनाच्या नियामक मंडळाने चाल दिली आहे. बारा वर्षांपूर्वीची तत्कालीक निविदा प्रक्रिया कार्यवाहीत आणण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
२०१० मध्ये या धरणाच्या कामावर निविदा प्रक्रियेवर ठपका आल्यानंतर त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती त्यामुळे या कामाला स्थगिती देण्यात आली होती दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत या निविदा प्रक्रियेला क्लीनचीट देण्यात आल्याने या कामाला पुढे नेण्याची मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केली होती.
दरम्यान, शासनाने ही धरण बांधण्यासाठी पुढाकार घेतला असून आज मुंबईतील सह्याद्री अतिगृहावर नियमन मंडळाची बैठक झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर सचिव संजय बेलसरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते या धरणामुळे नाशिकच्या भविष्यकालीन लोकसंख्येच्या विचार करून मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.