नाशिकच्या आय.टी. पार्कची उद्योजकांकडून पाहणी

By Admin | Updated: October 28, 2015 22:20 IST2015-10-28T22:19:24+5:302015-10-28T22:20:15+5:30

नाशिकच्या आय.टी. पार्कची उद्योजकांकडून पाहणी

Nashik's IT Inspect the park's entrepreneurs | नाशिकच्या आय.टी. पार्कची उद्योजकांकडून पाहणी

नाशिकच्या आय.टी. पार्कची उद्योजकांकडून पाहणी

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसी आयटी पार्क इमारतीस उद्योजकांनी भेट देऊन इमारत व तेथील सुविधांची पाहणी केली.
आय.टी. उद्योग चालू करण्यासाठी सदर इमारतीत वातानुकूलन यंत्रणा असणे आवश्यक असून, अनेक गाळ्यांमधील फ्लोअरिंग करणे बाकी आहे. सदर इमारतीत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही पण त्याची मागणी केल्यास ताबडतोब ओएफसी केबलने इंटरनेट सुविधा देणे शक्य असल्याचे भेटीप्रसंगी उपस्थित बी.एस.एन.एल. अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर आय.टी. पार्क इमारतीत प्रत्येक मजल्यावर दहा हजार चौरस फूटप्रमाणे तीन मजल्यांचे तीस हजार चौरस फूट बांधकाम असून, सर्व गाळे भाड्याने दिल्यानंतर येथे ५०० हून जास्त कॉम्प्युटर तंत्रज्ञ काम करतील त्यासाठी येथे कॅफेटेरियाचीही आवश्यकता आहे. एमआयडीसीने वाजवी दराने येथील गाळे भाड्याने दिल्यास २-३ महिन्यांत सर्व गाळे भाड्याने घेतले जातील, असे मत उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केले. या भेटीप्रसंगी एमआयडीसी व बीएसएनएलचे अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik's IT Inspect the park's entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.