नाशिकच्या अदितीला राष्ट्रीय जलतरणात दोन रौप्य
By धनंजय रिसोडकर | Updated: November 2, 2023 13:37 IST2023-11-02T13:37:16+5:302023-11-02T13:37:40+5:30
नाशिक : गोवा येथे सुरू असलेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत नाशिकची उदयोन्मुख जलतरणपटू अदिती हेगडे हिने राज्याचे प्रतिनिधित्व करताना दोन ...

नाशिकच्या अदितीला राष्ट्रीय जलतरणात दोन रौप्य
नाशिक : गोवा येथे सुरू असलेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत नाशिकची उदयोन्मुख जलतरणपटू अदिती हेगडे हिने राज्याचे प्रतिनिधित्व करताना दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे. नॅशनल गेम्समध्ये जलतरण प्रकारात पदक मिळवणारी नाशिकची पहिली खेळाडू होण्याचा मान अदितीने मिळवला आहे.
अदितीने चार बाय १०० मीटर फ्री स्टाइल रिले या प्रकारात तिच्या सहकाऱ्यांसह ३ मिनिटे ५९ सेकंद ६८ शतांश सेकंद या नवीन राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदक मिळवले. तर चार बाय दोनशे मीटर फ्रीस्टाइल रेल्वे प्रकारात देखील रौप्य पदक मिळवले आहे. यापूर्वी नाशिकला नॅशनल गेम्स मध्ये ड्रायव्हिंग या क्रीडा प्रकारात पदक प्राप्त झालेले आहेत. अदिती ही नाशिक मनपाच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक रोड येथे प्रशिक्षक शंकर मादगुंडी , विकास भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळ सायंकाळ सराव करते.