शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : दोन लाखांचे दागिने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:19 IST

नाशिक : एकंदरीतच रिक्षाचालकांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही़ मात्र, या व्यवसायातील काही रिक्षाचालकांमधील आपल्या व्यवसायाप्रतीची निष्ठा व प्रामाणिकपणा टिकून असल्याचे सोमवारी(दि़१८) दुपारी घडलेल्या घटनेमुळे सिद्ध झाले़ मुंबईतील जोगेश्वरी येथील एका दाम्पत्याची विसरलेली बॅग व त्यामधील दोन लाख रुपये किमतीचे दागिने रिक्षाचालक संजय पांडुरंग धोंगडे (रा़हिरावाडी, पंचवटी) यांनी प्रामाणिकपणे परत केली़

ठळक मुद्देमुंबईचे प्रवासी : रिक्षात विसरले बॅग रिक्षाचालक व पंचवटी पोलीसांचे मानले आभार

नाशिक : एकंदरीतच रिक्षाचालकांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही़ मात्र, या व्यवसायातील काही रिक्षाचालकांमधील आपल्या व्यवसायाप्रतीची निष्ठा व प्रामाणिकपणा टिकून असल्याचे सोमवारी(दि़१८) दुपारी घडलेल्या घटनेमुळे सिद्ध झाले़ मुंबईतील जोगेश्वरी येथील एका दाम्पत्याची विसरलेली बॅग व त्यामधील दोन लाख रुपये किमतीचे दागिने रिक्षाचालक संजय पांडुरंग धोंगडे (रा़हिरावाडी, पंचवटी) यांनी प्रामाणिकपणे परत केली़ त्यांच्या या प्रामाणिकपणाबाबत या दाम्पत्याने आभार तर मानलेच याशिवाय पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रिक्षाचालक धोंगडे यांचा सत्कार केला आहे़

मुंबईतील जोगेश्वरी येथील संदीप आमरे व त्यांची पत्नी ज्योती आमरे हे सोमवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील इंदू लॉन्स येथून रिक्षात (एमएच १५, झेड- ७२९९) बसले व पंचवटीतील निमाणी बसस्टॅण्डवर उतरले़ रिक्षातून उतरल्यानंतर ज्योती आमरे यांच्या लक्षात आले की त्यांची दोन लाख रुपये किमतीची दागिने ठेवलेली बॅग रिक्षामध्येच राहिली़ यानंतर आमरे दाम्पत्या या घटनेची माहिती देण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात आले असता त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शेगर व कर्मचाऱ्यांना रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले़

पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत असतानाच रिक्षाचालक धोंगडे यांनी संदीप आमरे यांना फोन करून फोन करून बोलावले व पोलीस ठाण्यात घेऊन आले़ यानंतर धोंगडे यांनी रिक्षात विसरलेली बॅग आमरे दाम्पत्याकडे सोपविल्यानंतर बॅगची तपासणी केली असता त्यातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवलेल्या ठिकाणीच असल्याचे आढळून आले़ रिक्षाचालक धोंगडे यांच्या प्रामाणिकपणामुळेच आमरे दाम्पत्यास त्यांचे दोन लाखांचे सोन्याचे दागिने परत मिळाले़ त्यांनी रिक्षचालक व पंचवटी पोलीसांचे आभार मानले़ 

टॅग्स :Nashikनाशिकauto rickshawऑटो रिक्षाGoldसोनंPoliceपोलिस