शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात अकरा लाखांचा दंड वसूल; ८१३ केसेस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:41 IST

सिडको : महापालिकेच्या सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरात रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर ...

सिडको : महापालिकेच्या सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरात रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणे यांसह इतर तक्रारी मिळून आठशेहून अधिक नागरिक व व्यावसायिकांवर कारवाई करीत सुमारे अकरा लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.महापालिकेच्या वतीने सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून घरपट्टी व पाणीपट्टी धडक वसुली मोहीम सुरू असून, या मोहिमेअंतर्गत थकबाकी दारांना नोटिसा तसेच मालमत्ता जप्तीपूर्वीचे वॉरंट बजाविण्यात आले आहे. या मोहिमेबरोबरच सिडकोतील घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, कचरा विलिनीकरण न करणे याबरोबरच प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणे आदी तक्रारींबाबत दंडात्मक कारवाईची मोहीम सतत राबविली जाते. या मोहिमेत एप्रिल २०१८ ते १५ मार्च २०१९ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ११ लाख दोन हजार ४५० इतका दंड वसूल केला आहे. यात पालापाचोळा, प्लॅस्टिक व सर्व प्रकारचा कचरा जाळणाऱ्या नऊ नागरिकांवर कारवाई करीत ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच रस्त्यावर घाण करणे व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे अशा ४४४ नागरिकांवर कारवाई करीत ४ लाख ४४ हजार ७५० रुपये दंड वसूल केला आहे, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २१ नागरिकांवर कारवाई करीत चार हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच उघड्यावर लघुशंका करणाºया ५० नागरिकांवर कारवाई करीत सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. याबरोबरच कचरा वर्गीकरण न करणाºया २०४ नागरिक व व्यावसायिकांकडून एक लाख ६८ हजार ५०० इतका दंड वसूल केला.

 

टॅग्स :Nashikनाशिकcidcoसिडको