शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंत्यासह लिपिकास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:46 IST

नाशिक : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळे व मुख्य लिपीक आप्पा शिवराम केदार या दोघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़१) या दोघांनाही अटक केली होती़

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभाग : वीस हजारांची लाच

नाशिक : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळे व मुख्य लिपीक आप्पा शिवराम केदार या दोघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़१) या दोघांनाही अटक केली होती़सुशिक्षित बेरोजगार युवकाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत विभागाकडे विद्युत अभियंता नोंदणीसाठी अर्ज केला होता़ या अर्जासंदर्भात तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास कांबळे यांना जाऊन भेटले असता त्यांनी नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून मुख्य लिपिक आप्पार केंदार यांना भेटण्यास सांगितले़ यावरून हा युवक मुख्य लिपिक आप्पा केदार यांना भेटण्यास सांगितले असता त्यांनी या नोंदणीसाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली़तक्रारदार युवकाने होकार दर्शवून कार्यालयातून काढता पाय घेतला; मात्र थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. वीस हजार रुपयांची लाचेची मागणी अधिकारी-कर्मचा-यांकडून केली जात असल्याची तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी(दि़१) सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात सापळा रचला.तक्रारदार युवक वीस हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी कांबळे यांच्याकडे गेला असता कांबळे याने ती रक्कम केदारकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे. या युवकाकडून लाचेची २० हजार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच या पथकाने अधिकारी कांबळे व लिपीक केदार या दोघांना अटक केली़ या दोघांनाही शुक्रवारी (दि़२) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़

टॅग्स :Nashikनाशिकpwdसार्वजनिक बांधकाम विभागArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग