घरफोडीत लॅपटॉप लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 17:30 IST2017-08-23T17:26:59+5:302017-08-23T17:30:21+5:30

घरफोडीत लॅपटॉप लंपास
नाशिक : बांधकाम विभागातील कर्मचाºयांच्या वसाहतीतील बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी लॅपटॉपसह सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़
विशाल भोर (रा.गंगासागर इमारत) यांनी पोेलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार १५ ते २१ आॅगष्ट या कालावधीत ते कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते़ या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या डायनिंग हॉलच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील हॉलमध्ये असलेल्या कपाटातून लॅपटॉप, घड्याळ, पेनड्राईव्ह, हेडफोन असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी भोर यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़