सासूसह बालकाची हत्त्या करणारा संशयित गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 17:20 IST2017-08-23T17:07:26+5:302017-08-23T17:20:00+5:30

सासूसह बालकाची हत्त्या करणारा संशयित गजाआड
पंचवटी : मखमलाबाद शिवारातील गांधारवाडी परिसरात राहणाºया सासूसह मेहुणीच्या आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून सासºयावर प्राणघातक हल्ला करून फरार असलेल्या रामवाडी येथील (तळेनगर) संशयित मोतीराम धोंडीराम बदादे याला पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने बुधवार (दि.२३) महामार्गावरील ठक्कर बझार परिसरातून अटक केली आहे. संशयित बदादे हा सव्वा महिन्यापासून फरार झाला होता.
बुधवारी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी खून प्रकरणातील फरार संशयित बदादे हा ठक्कर बझार परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक महेश इंगोले, हवलदार मोतीराम चव्हाण, आप्पा गवळी, सचिन म्हसदे,सतीश वसावे, भूषण रायते, बस्ते आदिंनी ठक्कर बझार परिसरात सापळा रचून बदादे याला बेडया ठोकल्या आहेत.