शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पोलीस अधिका-याच्या गाडीची काच फोडून रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:42 IST

नाशिक : पोलीस निरीक्षकाच्या स्कॉर्पिओ वाहनाची काच फोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील काठे गल्लीत घडली़ विशेष म्हणजे चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे द्वारका परिसरातील काठे गल्लीतील घटनाचोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पोलीस निरीक्षकाच्या स्कॉर्पिओ वाहनाची काच फोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील काठे गल्लीत घडली़ विशेष म्हणजे चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मूळचे धुळ्याचे व सध्या पिंपळगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक व्ही़ आऱ देसले हे पत्नी व चालकासह गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठी आपल्या स्कॉर्पिओ (एमएच १८, झेड ८१००) या चारचाकी वाहनाने आले होते़ द्वारका परिसरातील काठे गल्लीमध्ये गाडी लावून हे तिघे काही वेळासाठी दुकानात गेले असता चोरट्यांनी गाडीची पुढील काच फोडून रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरून नेली़

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़ या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे निरीक्षक आनंद वाघ, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, कमलाकर जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यामध्ये एक तरुण बॅग घेऊन जाताना दिसत असून त्याचा शोध सुरू आहे़ दरम्यान, पोलीस निरीक्षकांची वाहनेही चोरटे सोडत नाही तिथे सर्वसामान्यांची काय व्यथा अशी चर्चा आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसtheftचोरी