शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रामवाडीत पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 14:27 IST

नाशिक : रामवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ किशोर रमेश नागरे (२६, रामनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून फरार झाले़ नागरेच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असले तरी पूर्वर्वमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली ...

ठळक मुद्देपंचवटीत पुन्हा गँगवार : मारेकरी फरारमहिनाभरातील दुसरी घटना

नाशिक : रामवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ किशोर रमेश नागरे (२६, रामनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून घटनेनंतर मारेकरी दुचाकीवरून फरार झाले़ नागरेच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असले तरी पूर्वर्वमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ महिनाभरातील खुनाची ही दुसरी घटना असून या घटनांमुळे पंचवटीत पुन्हा गँगवार सुरू झाल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मयत नागरेचा भाऊ सचिन नागरे याने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास किशोर हा घरासमोरील मैदानात उभा होता. यावेळी सचिन-सचिन असा जोरजोराने आवाज दिल्याने ते घराबाहेर गेले असता त्यांना घरासमोरील मोकळ्या मैदानावर तोंडाला रुमाल बांधलेले संशयित लहान भाऊ किशोरच्या मानेवर, पाठिवर व पायावर धारदार शस्त्राने वार करीत होते़ सचिन नागरे यांनी मैदानाकडे धाव घेतली असता संशयित दुचाकीवरून फरार झाले़ सचिन नागरे यांनी गंभीर जखमी झालेला लहान भाऊ किशोर यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले़

या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, शांताराम पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, निरीक्षक दिनेश बर्डेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते़ नागरे याचा खून कोणी व का केला याबाबतची माहिती समोर आली नसून पंचवटी पोलीस व गुन्हे शाखेने संशयितांच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMurderखूनPoliceपोलिस