ओझरखेडला मायलेकाचा गळा चिरून निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:08 IST2017-08-05T15:08:10+5:302017-08-05T15:08:19+5:30

nashik,ozarkhed,mother,son,murder | ओझरखेडला मायलेकाचा गळा चिरून निर्घृण खून

ओझरखेडला मायलेकाचा गळा चिरून निर्घृण खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील कृष्णगाव शिवारातील शेळकेवाडीतील मायलेकाची त्याच्या झोपडीत गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़०४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ सविता गोटीराम साहळे (३५) व करण गोटीराम साहळे (११, दोघेही मूळ राहणार, मोळंगी कादवा, ता़दिंडोरी,जि़नाशिक) असे खून करण्यात आलेल्या मायलेकाची नावे आहेत़ ग्रामीण पोलिसांकडून मारेकºयाचा शोध सुरू असून या दोघांच्या खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही़
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णगाव शिवारातील शेळकेवाडी येथे सविता साहळे व तिचा मुलगा करण हे दोघेच एका झोपडीवजा घरात राहत असून पती गोटीराम साहळे यांचा सुमारे पाच वर्षांपुर्वी मृत्यू झाला आहे़ पतीच्या मृत्युनंतर सविता ही आई-वडीलांकडेच राहत होती़ रात्री साडेअकरा बारा वाजेच्या सुमारास या दोघा मायलेकांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आले़ मयत सविता साहळे यांची एक आत्या व भाऊ हे देखील घरापासून जवळच राहत असून त्यांनाही या घटनेची माहिती नव्हती़
दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचााºयांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले़ या घटनेमुळे ओझरखेडसह दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून मयत सविताच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू आहे़ दरम्यान, पोलीस संशयितांचा शोध घेत असून या मायलेकाची हत्त्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली, शेतजमिनीचा वा आणखी काही वाद होता का या कारणांचा शोध घेतला जातो आहे़ या प्रकरणी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

--कोट--
३१ जुलैला कल्याणला गाडीत माल भरून घेऊन गेलो होते़ तत्पुर्वी या दोघांना बाजारहाटासाठी पैसेही देऊन गेलो होतो़ मात्र चार दिवस गाडी खाली न झाल्यामुळे कल्याणलाच रहावे लागले़ त्यात, शुक्रवारी रात्री फोन आला व नाशिकला आल्यानंतर या दोघांचाही खून झाल्याची माहिती मिळाली़
- लहानू बोरस्ते, मयत सविताचा भाऊ़

Web Title: nashik,ozarkhed,mother,son,murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.