शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

दीड लाख विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाची पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 19:06 IST

: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली.

ठळक मुद्दे२६ रोजी पदवीदान : लष्करी जवान; बंदी बांधवांचाही समावेशआदिवासी भागातील १ हजार ५१२ विद्यार्थी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठातून यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पदवी घेतली असून, त्यांचा पदवीप्रदान सोहळा सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावर्षी १ लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली.या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मुरलीधर चांदेकर हे उपस्थित राहणार आहे. यावर्षी पदवी, पदविका घेणाऱ्यांमध्ये राज्यातील एक लाख विद्यार्थ्यांचा समावेश असून, या समारंभात एक लाख १७ हजार ३६९ विद्यार्थ्यांना पदवी, १५ हजार ६३२ पदविका, १८ हजार ३१३ पदव्युत्तर पदवी, ८४ हजार पदव्युत्तर पदवी, ११ एम फील, तर ३१ पीएचडी विद्यार्थी पदवीग्रहण करणार आहेत.यंदा पदवी, पदविका घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये पुरुषांची संख्या ९४ हजार २८१, तर महिलांची संख्या ६० हजार १५९ इतकी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पुरुष विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी वेगवेगळे असलेतरी महिलांचे ग्रामीण भागातील प्रमाण जवळजवळ सारखेच आहे. मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांत बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याचे चित्र आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. यावर्षी पदवी घेणाºया पुरुषांचे प्रमाण ५५, तर महिलांचे प्रमाण ४५ टक्के इतकेच आहे. स्त्री-पुरुष प्रमाणात सर्वाधिक महिलांची ९ हजार ५७६ संख्या ही नाशिक विभागात आहे. त्याखालोखाल ९ हजार ३२८ नांदेड आणि ८ हजार ३९० अमरावती विभागातील महिलांची संख्या आहे. शहरी भागातील विद्यार्थी ४९ हजार असून, उच्च शिक्षण समाजाच्या वंचित घटकांपर्यंत पोहचविण्याचे ध्येय असलेल्या मुक्त विद्यपाीठाने ग्रामीण भागातही मोठी विद्यार्थी संख्या मिळविली आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवी घेणाऱ्या  एकूण विद्यार्थ्यांपैकी १ लाख २ हजार ९८ विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे, तर आदिवासी भागातील १ हजार ५१२ विद्यार्थी आहेत.गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा यावर्षी पदवीग्रहण करणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ६० वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या तब्बल एक हजार ३१४ व्यक्ती आपले पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण करीत असून, त्यात सर्वाधिक ५०९ व्यक्ती मुंबईतील आणि २१४ विभागांतील आहेत. बी.एड.चे एक हजार ५०३ विद्यार्थी पदवी ग्रहण करीत असल्याचेही कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठeducationशैक्षणिक