नाशिक: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून चारा छावण्या आणि पाण्याचे टॅँकर्स सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय तातडीची उपाययोजना म्हणूनही मदत केली जात असतांना आता आमदारांच्या निधीतूनही २५ लाखापर्यंतची कामे दुष्काळनिवारणासाठी करता येणार आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर राज्य शाासनाकडून दुष्काळ निवारणाबाबतच्या उपाययोजना प्राधान्याने केल्या जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर आमदारांचा विकासनिधी दुष्काळनिवारणासाठी वापरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन चारा छावण्यांबरोबरच पाण्याच्या टॅँकर्सच संदर्भातील कामे प्राधान्याने करण्यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे दुष्काळ संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी २५लाखांची अधिखची मदत होणार आहे.टंचाई निवारणाच्या योजनेंतर्गत चारा छावणीतील जनावरांना खाद्य देण्यासाठी बकेट टब्ज देणे, गोशाळा शेड उभारणे तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणे आदी कामे केली यातून केली जाणार आहेत. याबाबतच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसंबधीत अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठ्याचे नियोजन आणि व्यवस्था करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
दुष्काळ निवारणासाठी आमदारांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 16:08 IST