शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मिनी ट्रॅक्टरचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:48 IST

अनुसूचित जाती आणि नवबौद्धांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या  ट्रॅक्टर अनुदानात पारदर्शकता यावी तसेच लाभार्थ्यांना थेट लाभ व्हावा यासाठी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देअनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकांना सहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर

समाजकल्याण : अनुसूचित जाती संवर्गासाठीची योजनानाशिक : अनुसूचित जाती आणि नवबौद्धांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना देण्यात येणाऱ्या  ट्रॅक्टर अनुदानात पारदर्शकता यावी तसेच लाभार्थ्यांना थेट लाभ व्हावा यासाठी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे.जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने (रोटेव्हेंटर व ट्रेलर) यांच्या खरेदीसाठी शासन ३ लाख १५ हजार रुपये कमाल अनुदान देणार आहे. सदर अनुदान लाभार्थ्याच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भातील अधिक माहिती सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडर सामाजिक न्याय भवन, नासर्डीपुलाजवळ येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ट्रॅक्टर व साधनांची किंमत साडेतीन लाखांपेक्षा अधिक असू नये त्यामध्ये शासन अनुदान हिस्सा ९० टक्के व बचत गटांचा हिस्सा १० टक्के इतका म्हणजे ३५ हजार रुपये आहे. ज्यांनी लाभासाठी अर्ज केलेले आहेत त्यातील ८० टक्के सभासद हे अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकांतील असले पाहिजे, असा निकष असून संबंधित बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजघटकातील असणे बंधनकारक आहे.या योजनेंतर्गत बचत गटांची निवड झाल्यानंतर केंद्राच्या मिनिस्ट्री आॅफ अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅन्ड फार्मर्स डिपार्टमेंट यांनी निर्धारित केलेल्या मानकानुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करावी लागणार आहेत. खरेदी पावती सादर केल्यानंतर खातरजमा करूनच अनुदानाचा ५० टक्के हप्ता बचत गटांच्या संलग्न खात्यावर जमा करण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या आरटीओ कार्यालयाकडील नोंदी केल्यानंतरच उर्वरित अनुदान जप्त होणार असल्याचे समाजकल्याणच्या उपायुक्तांनी कळविले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी