शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर ४३० शिक्षकांना मिळाले स्थायित्व प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:11 IST

स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देदोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या प्रमाणपत्राचा मुद्दा मात्र प्रलंबित नाशिकमधून दोनच शिक्षकांना प्रमाणपत्रे मिळाली

नाशिक : स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी  जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या स्थायित्व प्रमाणपत्राचा मुद्दा मात्र अजूनही प्रलंबित आहे.सन २००५ नंतर शिक्षक म्हणून असलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र या मागणीकडे तितके गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे गटशिक्षण स्तरावरच स्थायित्व प्रमाणपत्राची प्रकरणे पडून आहेत. बदलीच्या मागणीसाठी आॅफलाइन प्रकरणे सादर करीत असताना स्थायित्व प्रमाणपत्राची अडचण निर्माण होत नव्हती; परंतु बदलीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करताना स्थायित्व प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे त्यांचे अर्ज दाखल होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने स्थायित्व प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र  राज्य प्राथमिक शिक्षक संघाने  शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते.या प्रस्तावाची फाइल शिक्षणाधिकाऱ्यानी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे  ठेवली होती, तर आंतरजिल्हा बदलीचे अर्ज दाखल करण्याची तारीखही २१ फेब्रुवारी अंतिम असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर स्वाक्षरी केल्याने ४३० शिक्षकांना अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.--इन्फो--काही तालुक्यांमधील शिक्षक वंचित४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असले तरी यातून नाशिकमधून दोनच शिक्षकांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत. कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, मालेगाव येथील शिक्षकांना मात्र स्थायित्व प्रमाणपत्र मिळू शकले नाही. तेथील गट शिक्षणाधिकाऱ्यानी प्रस्तावच सादर केले नसल्यामुळे या तालुक्यांतील शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा