नाशिककरांची कोकण किनारपट्टीच्या पर्यटनाला पसंती

By Admin | Updated: April 4, 2017 02:16 IST2017-04-04T02:16:12+5:302017-04-04T02:16:28+5:30

नाशिक : शाळांच्या उन्हाळी सुट्या लवकरच सुरू होणार असल्याने पालकांनी आपल्या आवडीच्या ठिकाणी सहलीला जाण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे.

Nashikkar's choice of Konkan coast tourism | नाशिककरांची कोकण किनारपट्टीच्या पर्यटनाला पसंती

नाशिककरांची कोकण किनारपट्टीच्या पर्यटनाला पसंती

 नाशिक : बारावीची परीक्षा संपली असून, दहावीची परीक्षाही संपली आहे. तसेच शाळांच्या उन्हाळी सुट्या लवकरच सुरू होणार असल्याने पालकांनी आपल्या आवडीच्या म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जाण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे.
यंदा नाशिककरांकडून देश- विदेशांतील विविध पर्यटन स्थळांसोबतच कोकण पर्यटनाला विशेष पसंती मिळत आहे. परंतु, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याने वेळेच्या अभावामुळे आणि आर्थिक दृष्टीने परवडणाऱ्या स्थळांचा विचार करताना पर्यटकांकडून महाबळेश्वर आणि कोकणपट्ट्याचे पर्यटन करण्याचे बेत आखले जात आहेत.
शाळा व महाविद्यालयांना लवकरच सुट्या लागणार असून अनेकांनी उन्हाळी पर्यटनाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. देश-विदेशातील पर्यटनासोबतच नाशिककर पर्यटक खिशाचे बजेट पाहून देशांतर्गत व राज्यातील पर्यटन स्थळांच्या सहलींचे नियोजन करीत आहेत.
अनेक पर्यटक विविध यात्रा कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन चौकशी व बुकिंग करताना दिसत आहेत. तर आॅनलाइन बुकिंग करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सुट्यांमधील विशेष योजना, विमानाचे तिक ीट, परदेशी चलन, पर्यटन विमा, पासपोर्ट व विजा, हॉटेल बुकिंग आदि सेवा पुरविणाऱ्या यात्रा कंपन्यांना पर्यटक अधिक प्राधान्य देत आहेत.
देशांतर्गत प्रवासासाठी बहुतांश पर्यटक रेल्वे व बसेसला प्राधान्य देत आहेत. यातील बहुतेकांनी विविध यात्रा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहलींचे नियोजन केले आहे. अनेक जण राज्यातील सहलींनाच
जाण्याचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी राज्यातील महाबळेश्वर, माथेरान व कोकण पट्ट्यासह विविध लेणी व धार्मिक स्थळांच्या सहलीसाठीही पर्यटकांमध्ये उत्सुकता आहे. त्यासाठी विविध यात्रा कंपन्यांच्या माध्यमातून बुकिंग करण्यात येत आहे. तर अनेक जण अजूनही यात्रा कंपन्यांच्या संकेतस्थळावरून आल्हाददायक व खिशाला परवडणाऱ्या पर्यटन स्थळांचे पर्याय शोधत आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विभागाकडूनही पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध योजना आखण्यात आल्या असून, येथे संपर्क साधणाऱ्या पर्यटकांना विभागाशी संलग्न विविध पर्याय सुचवले जातात. त्यामुळे पर्यटकांना कमी खर्चातही पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो. (प्रतिनिधी)

Web Title: Nashikkar's choice of Konkan coast tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.