शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

नाशिककरांची जम्मू-काश्मीरला पसंती

By admin | Updated: May 5, 2014 20:08 IST

पर्यटन : सिंगापूर, मलेशिया, बॅँकॉकलाही प्राधान्य

पर्यटन : सिंगापूर, मलेशिया, बॅँकॉकलाही प्राधान्यनाशिक : उन्हाचा कडाका वाढत असताना सुरू झालेल्या सुट्यांमुळे नाशिककर सहलीचे नियोजन करीत असून, यातही जम्मू-काश्मीरला बहुतेकांची पसंती असल्याचे ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या रेकॉर्डवरून दिसते. सध्या नाशिकमध्ये पार्‍याने चाळिशी गाठली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना असलेल्या सुटीच्या हंगामामुळे अनेक कुटुंबांकडून सहलीचे आयोजन केले जात आहे. थंड हवेच्या ठिकाणांकडे त्यातही जम्मू-कामीरकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. यासाठी अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी खास पॅकेज सुरू केले आहे. त्याला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. एकेकाळी देशांतर्गत धार्मिक यात्रेनिमित्तच पर्यटन व्हायचे. त्यानंतर काही नैसर्गिक सहलीच्या निमित्ताने पर्यटन उद्योग नावारूपाला आला. आज या पर्यटन उद्योगाने मोठी भरारी घेतली असून, ट्रॅव्हल कंपन्यांनी खास योजना आखून सहलीची भुरळच पर्यटकांना घातली आहे. मंुबई, पुणे आणि नाशिक असा नवा त्रिकोण विकासाच्या दृष्टीने साधला जात असताना, केवळ मंुबई- पुण्यातच असणार्‍या नामांकित ट्रॅव्हल कंपन्यांनी नाशकातही चांगले बस्तान बसविले आहे. या कंपन्यांनी परदेशी पर्यटनाला भरभराटीला आणण्यासाठी खास योजना राबविल्या. तसेच त्यांच्यातील वाढत्या स्पर्धेमुळे आर्थिकदृष्ट्या परदेश वार्‍या करणेही पर्यटकांना स्वस्त आणि सोपे झाले आहे. बद्रीनाथ, केदारनाथसाठी स्पेशल योजनानाशिकमधील पर्यटकांचा जास्त ओढा दार्जिलिंग, जम्मू-काश्मीर, कुलू-मनाली या थंड प्रदेशांकडे आहे. याशिवाय दुय्यम स्वरूपात गुजरात, केरळ या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो. परदेशात सिंगापूर, मलेशिया, बॅँकॉक या ठिकाणांना प्राधान्य दिले जाते. काश्मीरसाठी ११, १५ आणि २० दिवसांसाठी सहल आयोजित केली जाते. बद्रीनाथ-केदारनाथला जाणार्‍यांची संख्या कमी आहे. तरीपण १० ट्रिप या सिझनमध्ये काढतोे. मग प्रवासी कमी असले तरी आम्ही त्यांना नेतोच.- ब्रीजमोहन चौधरी चौधरी यात्रा कंपनीथंड प्रदेशांना प्राधान्यउन्हाळ्याचा सिझन असल्याने सिमला, कुलू-मनाली, हिमाचल प्रदेश, काश्मीर, दार्जिलिंग भागात सहलीला जाण्यासाठी नाशिककर प्राधान्य देतात. यासाठी आम्ही त्या भागात सातत्याने सहलीचे आयोजन करीत असतो. रेल्वे आणि विमान सेवाही आम्ही देतो. कैलास मानस सरोवर यात्राही आयोजित करतो. त्यालाही नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळतो.- अंकित सोनवणे, दूर्वांकुर ट्रॅव्हल्सकाश्मीरमध्ये नाशिककरराज्यात सुरू असलेला उन्हाचा तडाखा पाहता सध्या थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जाण्यासाठी नाशिककरांची पसंती दिसते आहे. जम्मू-काश्मीर आणि कुलू-मनाली येथे चांगला प्रतिसाद आहे. - अंकित चौधरी, श्रीराम यात्रा