गरीब, गरजूंच्या मदतीसाठी धावले नाशिककर
By Admin | Updated: August 29, 2016 01:28 IST2016-08-29T01:24:39+5:302016-08-29T01:28:10+5:30
वर्षा रन : मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात

गरीब, गरजूंच्या मदतीसाठी धावले नाशिककर
सिडको : शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरीब, गरजू तसेच आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांना वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक मदतीचा हात देण्यासाठी नवजीवन फाउंडेशनने आयोजित केलेला ‘वर्षा रन’ कार्यक्रम ढोल- ताशांच्या गजरात उत्साहात साजरा झाला. नवजीवन फाउंडेशनचे विश्वस्त सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी काढण्यात आलेली प्रबोधन फेरी शिवशक्ती चौक येथून त्रिमूर्ती चौक, दिव्या अॅडलॅब, पवननगर, सावतानगरमार्गे काढण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या वर्षा रन प्रबोधन रॅलीत लेजीम, बांबू डान्स, ए रिस्पेक्ट फॅमिली डान्स ग्रुपचा समावेश होता. यावेळी इयत्ता तिसरीतील लोकेश पोटकुळे, राजू महाले (४ थी), सुशीला परदेशी (१० वी) यांना सायकल भेट देण्यात आली. तसेच तेजस्विनी सूर्यवंशी (९ वी) या अपंग विद्यार्थिनीलाही तीनचाकी सायकल भेट देण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी विश्वस्त सुभाष देशमुख, संचालक महेंद्र विंचूरकर, नगरसेवक तानाजी जायभावे, पारले कंपनीचे नंदिनी सरोदे, दत्तात्रय भोसले, शशिकांत पाटील, रोटरी क्लबचे डॉ. मनीषा जगताप, अश्विनी बिल्डरचे संचालक संजय साबळे, डॉ. सुरेश सूर्यवंशी, वैभव मराठे, भूषण कापडणे, वर्षा रनचे अक्षरी सोनटक्के, प्रवीण अहेर आदि सहभागी झाले होते. सूत्रसंचालन भूषण सबनीस यांनी, तर महेंद्र विंचूरकर यांनी आभार मानले.