शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककर गारठले : किमान तापमानाचा पारा ९.१अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 18:25 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तीन अंशांनी किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा राज्याचा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असेल.

ठळक मुद्देकडाका वाढलाशहरात थंडी पुन्हा परतली

नाशिक : शहर व परिसरात रविवारी संध्याकाळपासून अचानकपणे थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना येत होता. सोमवारी (दि.२१) पहाटे थंडीचा कडाका जाणवला. सकाळी साडेआठ वाजता ९.१ अंश इतके तापमान नोंदविले गेले. हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान आहे.हवामान अन‌् हलक्या सरींचा वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा नाशिककर आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते. मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असून लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश तर किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. एका दिवसात किमान तापमानाचा पारा थेट पाच अंशांनी खाली घसरला.शहराचे वातावरण थंड होऊ लागले असून किमान तापमानाचा पारा या आठवड्यात वेगाने घसरण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. उत्तरेकडील शीतलहरी राज्याच्या वेशीवर आल्याने शहराच्या वातावरणात अचानकपणे गारठा वाढू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. ढगाळस्थिती दूर झाल्यामुळे सध्या कोरडे वातावरण अनुभवयास येत आहे. अरबी समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणातून थंडी गायब झाली होती. राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भाला पुन्हा हुडहुडी भरु लागली असून सोमवारी गोंदिया येथे राज्यातील सर्वाधिक नीचांकी ७अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. त्याखालोखाल नागपूर, वर्धामध्ये पारा घसरला आहे. एकूणच विदर्भ गारठत असताना रविवारी संध्याकाळपासून उत्तर महाराष्ट्रातही थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याचे दिसून आले.तीन अंशांनी घसरण होण्याची शक्यताहवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तीन अंशांनी किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा राज्याचा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असेल. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वारे सक्रिय असल्याची स्थिती आहे, त्याचा परिणाम काही दिवसांत दिसून येऊ शकेल.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान