नाशिककर गणेशभक्त झाले पर्यावरणस्नेही

By Admin | Updated: September 4, 2016 00:58 IST2016-09-04T00:50:53+5:302016-09-04T00:58:12+5:30

शाडूचे बुकिंग हाऊसफुल्ल : पीओपीच्या मूर्तींना ग्राहकांची प्रतीक्षा

Nashikkar became a devotee of Lord Ganesh | नाशिककर गणेशभक्त झाले पर्यावरणस्नेही

नाशिककर गणेशभक्त झाले पर्यावरणस्नेही

भाग्यश्री मुळे ल्ल नाशिक
गेल्या काही वर्षांपासून राज्यभर शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे गणेशभक्तांचा कल वाढला असून, यावर्षी त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. नाशिककर गणेशभक्तांनी शाडूच्या मूर्तींचीच सर्वाधिक बुकिंग केले असल्याने पीओपी अर्थात प्लॅस्टिर आॅफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात पडून असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यावरून नाशिककर पर्यावरणस्नेही होत असल्याचे दिसून येत असून, गणेशोत्सवानंतर शाडूच्या मूर्तीचे विसर्जनही घरच्या घरी टबमध्ये, बादलीत करण्याचा निर्णयही अनेक गणेशभक्तांनी बोलून दाखविला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाडू मूर्तीची मागणी वाढली असल्याने पूर्वी हाताने बनविल्या जाणाऱ्या मूर्ती यंदा कापडी आणि रबरी साच्यात बनवून घेतल्या जात असून मागणी लक्षात घेता यंदा शाडूच्या मूर्तींचे प्रमाण वाढवून ते विक्रीस आणल्याचे चित्र आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसप्रमाणेच शाडूच्या मूर्तीतही वैैविध्य, नाजूक नक्षी साकारली जात असल्याने बोलकी मूर्ती हे वैशिष्ट्ये पहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण आणि भक्ती या दोन्ही गोष्टी एकत्रित साध्य होत आहेत.

Web Title: Nashikkar became a devotee of Lord Ganesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.