शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना जाणवू लागला उन्हाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:53 IST

पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. अधूनमधून उपनगरांमध्ये सरींचा अल्पवेळ तसा जोरदार वर्षाव होत असला तरी वातावरणातील उष्मा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर रात्री उशिरा सरींचे आगमन काही उपनगरीय परिसरात होते. ऊन, पाऊ स अन् सायंकाळी वातावरणात निर्माण होणारा गारवा या बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.

ठळक मुद्देकमाल तापमानात वाढ : हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम

नाशिक :पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. अधूनमधून उपनगरांमध्ये सरींचा अल्पवेळ तसा जोरदार वर्षाव होत असला तरी वातावरणातील उष्मा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर रात्री उशिरा सरींचे आगमन काही उपनगरीय परिसरात होते. ऊन, पाऊ स अन् सायंकाळी वातावरणात निर्माण होणारा गारवा या बदलत्या हवामानामुळेआरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.पावसाने उघडीप दिल्यानंतर ‘आॅक्टोबर हिट’चा सामना नागरिकांना करावा लागू शकतो. त्या दिशेने शहराच्या हवामानाची वाटचाल सुरू झाली आहे. दिवसा प्रखर ऊन पडत असून, सायंकाळी पुन्हा थंड वारे वाहू लागतात. त्यामुळे नाशिककरांना सध्या काहीसा विचित्र असा अनुभव हवामानाच्या बाबतीत येताना दिसत आहे. उन्हाची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. कमाल तापमानाचा पारा सोमवारी (दि.१४) ३१.७ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. तसेच किमान तापमान २२.३ अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना रविवारी रात्रीदेखील उकाडा काही प्रमाणात जाणवला. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी व सायंकाळी जास्त राहत असल्याने वातावरणात दमटपणाही जाणवतो.विषाणूजन्य आजाराचा फैलाव वाढलाअचानकपणे शहरातील हवामान बदलू लागल्याने पुन्हा विषाणूजन्य आजारांचा फैलावदेखील होत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुुखीच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पावसाळा संपून हिवाळा ऋ तूला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विचित्र हवामान तयार झाल्याने विषाणूजन्य आजारांचा जंतूसंसर्ग नागरिकांना होऊ लागला आहे.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानHealthआरोग्य