शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनी लुटली श्रावणसरींची मौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:12 IST

यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये ओढ देणारा पाउस जुलैमध्ये समाधानकारक कोसळल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनत धुव्वाधार बरसत आहे. गेल्या आठवडयापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर शहरात पाऊस कोसळयानंतर रविवारही पाऊस सुरु असल्याने नाशिककरांना सकाळपासूनच पावसात चिंब होण्याचा आनंद लुटला. 

ठळक मुद्देनाशिकरांनी लुटली पावसाची मौज रविवारच्या सुट्टीचा ऩागरिकांनी घेतला आनंद पावसात भिजण्यासाठी मुलांसह नाशिककर रस्त्यावर

नाशिक यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये ओढ देणारा पाउस जुलैमध्ये समाधानकारक कोसळल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनत धुव्वाधार बरसत आहे. गेल्या आठवडयापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर शहरात पाऊस कोसळयानंतर रविवारही पाऊस सुरु असल्याने नाशिककरांना सकाळपासूनच पावसात चिंब होण्याचा आनंद लुटला. शहरातील विविध परिसरातील सखल भागात पाणीसाचल्याने नाशिककरांनी रस्त्यावर येऊन पावसात भिजण्याची आनंद घेतला.कॉलेजरोड, गंगापूर रोड, आसारामबापू पूल, मखमलाबाद रोड, अशोकामार्ग,  रविशंकर मार्ग पाखाल रोड, वडाला पाथर्डी रोड, तपोवन रोड या सह त्रीमूर्ती चौक,उपनगर या भागात नागरिकांना रस्त्यावर येऊन पावसात चिंब भिजण्याचा आनंद लूटला. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज पाहून नागरिकांना आपल्यासोबत लहानग्या मुलांनाही पावसात चिंब होऊ मौज लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली. अनेकजणांनी रविवाकच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जवळच्या पर्यटनस्थळांवर जाण्याचा बेत आखला होता. परंतु पावसामुळे त्यांच्या नियोजनावर पाणी फिरल्याने ज्याठिकाणी वाहने अडकली त्याच ठिकाणी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. 

वाफाळलेला चहा आणि कांदभज्जीवंर तावनाशिककरांना गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असेल्या मुसळधार पावसाने अखेर श्रावणात नाशिकरांना चिंब केले. या पावसाचे शहरवासीयांनीही उत्साहात स्वागत केले असून पावसामुळे थंडगार झालेल्या वातावरणात वाफाळणारा चहा आणि गमागरम भज्जीचा आस्वाद घेण्यासाठीही पाणी न साजणाऱ्या भागातील ठिकठिकाणच्या स्टॉलवर नािगरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.  

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकRainपाऊस