दुचाकी चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:08 IST2017-08-19T23:06:53+5:302017-08-19T23:08:28+5:30

दुचाकी चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका दुचाकीचोरास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़ पुष्कराज सोमनाथ जाधव (२५, रा़वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा, नाशिक) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सुनील बोडके, राम जाधव, टोपले, राऊत, खांडबहाले, शिंदे हे गुरुवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास परिसरात गस्त घालीत होते़ पाथर्डी फाट्यावरील दामोदरनगरमधील पांडुरंग चौकात गस्त घालीत असताना पुष्कराज जाधव हा संशयास्पदरीत्या आढळून आला़ त्याची कसून चौकशी केली असता त्याने वणी येथून होंडा सीडी डिलक्स (एमएच १५, बीवाय ४७८८), सिडकोतील राणेनगर येथून अॅक्टिवा (एमएच १५, ईटी ६४४१) तर म्हसरूळ येथून (एमएच १५, सीयू ६३३३)अशा तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली़
इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़