शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलचा मॅनेजर अडीच लाखांची रोकड घेऊन फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:41 IST

नाशिक : हॉटेलमध्ये विवाहाच्या बुकिंगसाठी ग्राहकाने दिलेले पैसे व तीन दिवसांची जमा झालेली रक्कम असे २ लाख ६८ हजार रुपये घेऊन हॉटेलचा जनरल मॅनेजर फरार झाल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल ज्युपिटरमध्ये घडली आहे़

ठळक मुद्देपाथर्डी फाट्यावरील घटना : इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : हॉटेलमध्ये विवाहाच्या बुकिंगसाठी ग्राहकाने दिलेले पैसे व तीन दिवसांची जमा झालेली रक्कम असे २ लाख ६८ हजार रुपये घेऊन हॉटेलचा जनरल मॅनेजर फरार झाल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल ज्युपिटरमध्ये घडली आहे़

आकाश शर्मा (रा़ ज्युपिटर हॉटेल, मुंबई-आग्रारोड, नाशिक) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या ज्युपिटर हॉटेलमध्ये संशयित दुर्गेश रामकुमार चौधरी हा जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत होता़ १७ ते १९ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत डॉ़ देवरे यांनी हॉटेलमध्ये जाऊन साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी हॉटेल बुक करून दोन लाख रुपये हॉटेल मॅनेजर तुषार अभनावे व किरण हिवासे यांच्यासमोर चौधरीस दिले़ मात्र चौधरी याने देवरे यांना पावती न देता उद्या पावती देतो, असे सांगितले़

त्यानुसार दुसºया दिवशी सकाळी देवरे यांनी फोन केला असता मी हॉटेलमध्ये नाही, तुमची रक्कम उद्या सकाळी जमा करतो, असे सांगितले़ मात्र हॉटेलमध्ये नोकरीवर न येता तसेच ही रक्कम हॉटेलच्या खात्यावर जमा न करता चौधरी याने या रकमेसह तीन दिवसांचे जमा झालेले ६८ हजार रुपये व बुकिंगसाठी दिलेले दोन लाख असा २ लाख ६८ हजार रुपयांचा अपहार करून फरार झाला़

या प्रकरणी शर्मा यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात हॉटेलचा जनरल मॅनेजर चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा