शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या टिटवाळ्याच्या संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 11:14 IST

नाशिक : दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इनच्या मागे सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून दोन गावठी कट्टे, दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत़

ठळक मुद्देठाणे जिल्ह्यातील संशयित : युनिट एकची कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इनच्या मागे सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून दोन गावठी कट्टे, दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत़

पाथर्डी फाटा परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील संशयित येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व पोलीस कर्मचारी शांताराम महाले यांना मिळाली होती़ त्यानुसार शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास हॉटेल एक्सप्रेस इनच्या पाठिमागील परिसरात सापळा लावण्यात आला होता़ संशयित निगेहबान इम्तियाज खान (४१, ओमकार रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर ५०३, बी़ विंग, टिटवाळा स्टेशन) व रणजित गोविंदराम मोरे (३२, रा़२०५, सी विंग, हरिविश्व सोसायटी, पाथर्डीफाटा, एक्स्प्रेस इनच्या पाठिमागे) हे दोघे संशयास्पदरित्या आढळून आले़

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित निगेहबान खान याने रणजित मोरे यास दोन गावठी कट्टे व काडतुसे विक्रीसाठी आल्याची कबुली दिली़ या दोघांकडील दोन गावठी कट्टे तसेच दहा जिवंत काडतुसे असा ६१ हजार ३०० रुपयांचा ऐवज पोलिसानी जप्त केला़ या दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

गावठी कट्टे विक्री  शहरात गावठी कट्टे विक्रीचे रॅकेट कार्यरत असलयाची शक्यता पोलीस अधिका-यांनी व्यक्त केली आहे़ शहरातील विविध पोलीस ठाणे, गुन्हे शाखा युनिट एक व दोन यांनी आतापर्यंत २२ गावठी कट्टे व ५० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ विशेष म्हणजे शस्त्र बाळगणा-यांमध्ये राजकीय नेत्याचा मुलाचाही समावेश आहे़  

गावठी कट्टे परराज्यातूनशहरात येणारे गावठी कट्टे हे परराज्यातून येत असल्याचे समोर आले आहे़ यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून कट्टे विक्रीतील काही संशयितांनी नावे समोर आली असून त्यांच्या माहितीवरून या रॅकेटच्या मुळापर्यंत जाणार आहोत़  - अशोक नखाते, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक़   

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाPoliceपोलिस