लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शालिमार येथून रिक्षाने प्रवास करताना रिक्षामध्येच विसरलेला चार तोळे वजनाचा सोन्याचा चपलाहार भद्रकाली पोलिसांचे प्रयत्न व रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेस परत मिळाला आहे़ या प्रामाणिकपणाबाबत भद्रकाली पोलीस व महिलेने रिक्षाचालक भूषण गांगुर्डे यांचा सत्कार केला आहे़पुष्पा पांडे या महिलेने शालिमार येथे रिक्षाने प्रवास करीत असताना त्यांच्याकडील चपलाहार त्या रिक्षातच विसरल्या होत्या़ त्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी भद्रकाली पोलिसांकडे धाव घेऊन माहिती दिली़ मात्र त्यांना रिक्षाचा नंबर वा रिक्षाचालक असे काहीही सांगता येत नव्हते़ असे असतानाही पोलीस अधिकारी विशाल मुळे व शिपाई सोमनाथ सातपुते यांनी रिक्षाचा (एमएच १५ जे ८५७३) शोध घेतला़, तर रिक्षाचालक भूषण गांगुर्डे यांनीही प्रामाणिकपणे हा चपलाहार पोलिसांकडे सुपूर्द केला़भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी व पुष्पा पांडे यांनी रिक्षाचालक गांगुर्डे यांचा सत्कार करून आभार मानले़
सोन्याचा हार परत करणाºया रिक्षाचालकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 22:17 IST
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शालिमार येथून रिक्षाने प्रवास करताना रिक्षामध्येच विसरलेला चार तोळे वजनाचा सोन्याचा चपलाहार भद्रकाली पोलिसांचे प्रयत्न व रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेस परत मिळाला आहे़ या प्रामाणिकपणाबाबत भद्रकाली पोलीस व महिलेने रिक्षाचालक भूषण गांगुर्डे यांचा सत्कार केला आहे़पुष्पा पांडे या महिलेने शालिमार येथे रिक्षाने प्रवास करीत असताना त्यांच्याकडील चपलाहार ...
सोन्याचा हार परत करणाºया रिक्षाचालकाचा सत्कार
ठळक मुद्देशालिमार येथून रिक्षाने प्रवासचार तोळे वजनाचा सोन्याचा चपलाहार विसरला