नगरसेवक शेलार यांच्या अटकेचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:04 IST2017-09-11T22:59:09+5:302017-09-11T23:04:16+5:30

नगरसेवक शेलार यांच्या अटकेचा मार्ग मोकळा
नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडून डीजे वाजविल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़११) फेटाळला़ यामुळे शेलार यांच्या अटकेबाबत पोलिसांसमोरील अडथळा दूर झाला ते फरार झाले आहेत़ दरम्यान, उर्वरित वारे व कर्पे या दोन संशयितांचे अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आले आहेत़
ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडून डिजे वाजविल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलिसांनी दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष गजानन शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला़ यांनतर नामको बँक तसेच शहरात खुलेआम फिरणाºया नानांऐवजी मंडळाच्या पदाधिकाºयांना अटक करण्याचा फार्स पोलीस यंत्रणेने राबवून नानांना अटकपूर्वसाठी पुरेपूर संधी दिली़ यांनतर नानांनीही या संधीचा फायदा घेत जिल्हा न्यायालयात अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला़ यावर युक्तिवाद होऊन सोमवारी निर्णय होणार होता़
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात दुपारी सरकारी वकील व शेलार यांचे वकील अॅड़ राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला़ शासकीय विश्रामगृहातील कर्मचाºयाने त्यात शेलार यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले़ यानंतर न्यायाधीश शिंदे यांनी नगरसेवक गजानन शेलार यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करून दुर्गेश दिलीप वारे (३८, आझाद चौक, जुने नािशक) व मयूर ऊर्फ देवेंद्र मुरलीधर कर्पे (३४, रा़ बुधवार पेठ, जुने नाशिक) यांचा अर्ज मंजूर केला़ दरम्यान, याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेलार यांच्या वकिलाने सांगितले़