नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. येत्या बुधवारपासुन (दि..२८) तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचीदेखील या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे.नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व जैन सेवा कार्य समितीच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्ताने प. सा. नाट्यमंदिर येथे दररोज सायंकाळी ७ वाजता सदर व्याखानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेचे आयोजन २३ वर्षांपासून केले जात असून, अनेक मान्यवरांची व्याख्याने या ठिकाणी झालेली आहेत. यंदाही व्याख्यानमालेसाठी अनेक दिग्गज मान्यवर व्याख्यानमालेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.बुधवार, दि. २८ रोजी महाराष्ट्र मंत्री व ज्येष्ठ कॉँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे ‘महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा’ या विषवार ते व्याख्यान देणार आहे. गुरुवार, दि. २९ रोजी माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे ‘महाराष्ट्र आणि देशाची सद्य:स्थिती’ या विषयावर व्याख्यान दिले. शुक्रवार, दि. ३० रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे ‘भारताची आर्थिक वाटचाल आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मोहनलाल लोढा, कार्यध्यक्ष प्रवीण खाबिया, सुनील बुरड, गौतम सुराणा प्रयत्नशील आहेत.
महावीर जन्मकल्याणक सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा नाशिकमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:25 IST
दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. येत्या बुधवारपासुन (दि..२८) तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचीदेखील या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे.
महावीर जन्मकल्याणक सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा नाशिकमध्ये
ठळक मुद्दे तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांची व्याख्यानेहर्षवर्धन पाटील हे ‘महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा’ या विषवार ते व्याख्यान देणार