शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांसोबतच्या झटापटीत जखमी झालेल्या युवतीच्या आईचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:59 IST

नाशिक : सहा दिवसांपुर्वी बँकेतून काढलेल्या दोन लाख रुपयांची लूट करणाऱ्या दोघांचा दुचाकीवरून पाठलाग करून चोरट्यांकडून पैशांची बॅग परत मिळवितांना नासर्डी पुलावर झालेल्या झटापटीत दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या रणरागिणीच्या आईचा मंगळवारी (दि़२०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ शीला चंद्रशेखर गायकवाड (फ्लॅट नंबर १२०१, पार्कसाईड, रेसिडेन्सी, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़

ठळक मुद्दे नासर्डीपुलावरील घटना : चोरट्यांसोबत झटापटसात दिवस मृत्युशी झुंज ; उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : सहा दिवसांपुर्वी बँकेतून काढलेल्या दोन लाख रुपयांची लूट करणाऱ्या दोघांचा दुचाकीवरून पाठलाग करून चोरट्यांकडून पैशांची बॅग परत मिळवितांना नासर्डी पुलावर झालेल्या झटापटीत दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या रणरागिणीच्या आईचा मंगळवारी (दि़२०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ शीला चंद्रशेखर गायकवाड (फ्लॅट नंबर १२०१, पार्कसाईड, रेसिडेन्सी, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये अतिरिक्त कलम वाढविण्यात आले आहे़

पार्कसाईड रेसिडेन्सीतील रहिवासी शीला गायकवाड या १४ मार्च २०१८ रोजी मुलगी तक्षशिलासोबत नाशिक- पुणे रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बँकेतून काढलेले दोन लाख रुपये बॅगेत ठेवून यामाहा फसीनो दुचाकीवरून (एमएच १५, एफआय ००६१) तक्षशिलासोबत घरी जात असताना पाळतीवर असलेल्या पल्सर दुचाकीवरील दोन संशयितांनी नासर्डी पुलाजवळ शीला गायकवाड यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावली़ यावेळी हातास बसलेल्या झटक्याने शीला गायकवाड या दुचाकीवरून खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली़

यावेळी दुचाकी चालवत असलेल्या तक्षशिला गायकवाड (२८) हिने स्वत:चा तोल सावरला आणि चोरट्याचा पाठलाग केला़ यानंतर अतिशय धाडसाने चोरट्यांच्या हातातील पैशांची बॅग झटापट करून पुन्हा ताब्यात घेतली. या झटापटीत चोरट्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहाता आला नाही तर नागरिकांच्या गर्दीमुळे दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून तत्काळ पळ काढला. यानंतर तक्षशिला यांनी आपल्या जखमी आईला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले व मुंबई नाका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली़ या प्रकरणी जबरी लुटीचा व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा संशयित चोरट्याविरुद्ध दाखल केला़सात दिवस मृत्युशी झुंजमुलीच्या मागे दुचाकीवर बसलेल्या शिला गायकवाड यांच्या हातातील पैशांची बॅग चोरटे हिसकावत असताना त्यांनी प्रतिकार केला़ मात्र, चोरट्यांनी दिलेल्या जोरदार झटक्यामुळे बॅग खेचण्यात चोरटे यशस्वी झाले तर शिला या दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्यास गंभीर मार लागला़ त्यांच्यावर खासगी रुग्णालयात १४ मार्चपासून उपचार सुरू होते़ मंगळवारी (दि़२०) सकाळच्या सुमारास शिला गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

सीसीटीव्ही फुटेज हातीगत बुधवारी लुटारुंसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या शिला गायकवाड यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला़ या चोरटयांपैकी एकाचे सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती लागले असून या दोघांचाही शोध सुरू आहे़ दरम्यान, या दोघांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अतिरिक्त कलम वाढविण्यात आले आहे़-सुनील नंदवाळकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा