शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये बनावट मृत्यूपत्राद्वारे जमिन हडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:51 IST

नाशिक : शेतजमिनीची मूळमालक असलेली महिला जिवंत असताना तिच्या नावे बनावट इच्छापत्र व तिच्या नव-याचा बनावट मृत्यूचा दाखल तयार करून २४ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सगायी मायकल दास (६८, रा. धोंडीरोड, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक) या महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देबनावट इच्छापत्र व नव-याचा बनावट मृत्यू दाखला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक : शेतजमिनीची मूळमालक असलेली महिला जिवंत असताना तिच्या नावे बनावट इच्छापत्र व तिच्या नव-याचा बनावट मृत्यूचा दाखल तयार करून २४ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सगायी मायकल दास (६८, रा. धोंडीरोड, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक) या महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात झरीन मायकल डेव्हिस (वय ६८, रा. ए-५, न्यू गार्डन, अल्मेडा रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह दि. १९ जुलै १९७२ रोजी विंग कमांडर सुधीर कृष्णराव जगताप यांच्याशी झाला होता. त्यानंतर दि. २१ नोव्हेंबर १९८८ रोजी त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान, दि. २९ सप्टेंबर १९८९ रोजी झरीन यांनी मायकल डेव्हिस यांच्याशी खासगी स्वरूपात लग्न केले. त्यानंतर झरीन व मायकल डेव्हिस हे देवळाली कॅम्प येथील ग्रँड हॉटेल व मुंबईतील बांद्र्याजवळील अल्मेडा रोड येथे राहात होते. याचदरम्यान दि. २ मे २०१५ रोजी झरीन व मायकल पती-पत्नी मुंबई येथे असताना ख्रिस्तेफर डिसूझा, पॅट्रिशानाथ व व्हॅलेरी अ‍ॅन मुल्ला यांच्यासमक्ष मायकल यांनी आपली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता झरीन यांच्या नावावर केली होती़

झरीन यांनी भगूर येथील तलाठी कार्यालयात त्यांच्या मालमत्तेच्या दस्तऐवजाची फेरफार होऊन सात-बारा उता-यावर नोंद होण्यासाठी अर्ज केला असता २५ सप्टेंबर २०१७ रोजी देवळाली मंडल अधिकारी कार्यालयाकडून त्यांना नोटीस मिळाली़ त्यामध्ये संशयित सगायी मायकल दास (रा. धोंडी रोड, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक) या महिलेने फेरफार नोंदीस आक्षेप घेतल्याचे म्हटले होते़ यानंतर संशयित सगायी व झरीन या आपल्या कुटुंबीयांसह मंडल अधिकारी कार्यालयात आल्या असता संशयित सगायी हिने झरीन यांचे पती मायकल डेव्हिस यांचे दि. ३० मार्च २००५ रोजीचे बनावट इच्छापत्र तयार केल्याचे आढळून आले, तर बनावट इच्छापत्रामध्ये मायकल डेव्हिस यांचे नाव डॉ. एस. पी. वझे असे दिले आहे.

संशयित सगायी मायकल दास यांनी इच्छापत्रासोबत प्रतिज्ञापत्र आणि मायकल डेव्हिस यांचा मृत्यूचा दाखला बनावट पद्धतीने तयार करून संशयित सयागी दास हिने झरीन डेव्हिस यांच्या मालकीची २४ गुंठे जमीन हडपण्याचा कट रचून दि. ४ नोव्हेंबर २०१७ रोजी वर्तमानपत्रात वरील मिळकतीबाबत टायटल व्हेरीफिकेशनसाठी जाहीर नोटीस दिली. त्यामुळे झरीन यांना मिळालेल्या नोटिसीनुसार त्यांनी आपल्या मालमत्तेची माहिती मिळविली असता संशयित सगायी हिने झरीन यांच्या पतीचे बनावट इच्छापत्र, तिचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र आणि मायकल डेव्हिस यांचा बनावट मृत्यूचा दाखला तयार केल्याचे आढळून आले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा