शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा  मोबदला न दिल्याने अभियंत्याची खुर्ची जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:33 IST

दिंडोरी तालुक्यातील मौजे साद्राळ येथील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाचा पुरेसा मोबदला न दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करण्यात आली.

ठळक मुद्दे पाझरतलावासाठी संपादित करण्यात आली होती. व्याजासह मोबदला मिळावा अशी याचिका

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मौजे साद्राळ येथील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाचा पुरेसा मोबदला न दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करण्यात आली.भूसंपादन कायदा कलम १८ नुसार न्यायालयाने कार्यकारी अभियंत्याची खुर्ची आणि दोन संगणक जप्त करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार न्यायालयाने संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत जाऊन कारवाई केली. १९९६ मध्ये सुमारे १४ शेतकऱ्यांची शेतजमीन पाझरतलावासाठी संपादित करण्यात आली होती. या शेतकऱ्यांना बाजारमूल्यप्रमाणे मोबदला न मिळाल्याने त्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी वारंवार लघुपाटबंधारे विभागाकडे मागणी नोंदविली होती. मात्र संबंधित विभागाकडून वारंवार आश्वासन दिले जात होते. वर्षानुवर्ष केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात होती. नंतरच्या काळात अधिकाºयांकडून कोणतीही दाद दिली जात नव्हती, शेतकऱ्यांच्या  मागणीची कोणतीही दखल घेतली जात नव्हती.जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या दिरंगाईमुळे आर्थिक कोंडी झालेल्या गणपत हरी भुसारे, विष्णू धोंडीराम राऊत, यशवंत नारायण भुसारे, जगन्नाथ रंगनाथ भुसारे आदी सुमारे १४ शेतकऱ्यांनी अखेर २०१५ मध्ये न्यायालयात धाव घेऊन व्याजासह मोबदला मिळावा अशी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेतला प्रतिसाद न देता लघु पाटबंधारे विभागाकडील अधिकारी, कर्मचारी तारखेला गैरहजर राहत होते, तर अनेकदा त्यांनी भरपाई देण्याचे मान्यही केले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे भरपाई मिळू शकलेली नव्हती. संबंधित शेतकऱ्यांना मूळ मोबदला व्याजासह देण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाला बजविले होते. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेशित केलेले असतानाही शेतकºयांना मोबदला मिळत नव्हता. अखेर न्यायालयाने प्रकल्पग्रस्त गणपत भुसारे यांना मूळ रक्कम ८ लाख ९० हजार ५९८ रुपये तसेच व्याजाची रक्कमसह मोबदला अदा करण्याचे आणि रक्कम न दिल्यास खुर्ची आणि संगणक जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयाने शुक्रवारी जप्तीची कारवाई केली.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorतहसीलदारzpजिल्हा परिषद