शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना पोलिओचे डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:01 IST

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना रविवारी (दि़ ११) पोलिओचे डोस पाजण्यात आले़ नाशिक महापालिका क्षेत्रात १ लाख ४६ हजार ३८३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ हजार ३८७, ग्रामीण भागात ३ लाख ९३ हजार ५२१ तर नगरपालिका क्षेत्रात ५१ हजार ८७८ असे एकूण ६ लाख ४४ हजार १६९ बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात आले़

ठळक मुद्देराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ; ६ लाख ४४ हजार १६९ बालकांचे लसीकरण

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना रविवारी (दि़ ११) पोलिओचे डोस पाजण्यात आले़ नाशिक महापालिका क्षेत्रात १ लाख ४६ हजार ३८३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ हजार ३८७, ग्रामीण भागात ३ लाख ९३ हजार ५२१ तर नगरपालिका क्षेत्रात ५१ हजार ८७८ असे एकूण ६ लाख ४४ हजार १६९ बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात आले़

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते बालकाला पोलिओ डोस पाजून शुभारंभ करण्यात आला़ यावेळी प्रभाग सभापती श्रीमती शाहीन मिर्झा, नगरसेविका अर्चना थोरात, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते पांढुर्ली येथे लहान बालकास पोलिओचा डोस पाजून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या मोहिमेचा शुभारंभ केला़ यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाक्चौरे उपस्थित होते़ तर जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे, जागतिक आरोग्य संघटनेचे राज्यस्तरीय सर्वेक्षर वैद्यकीय अधिकारी डॉ़ कमलाकर लष्करे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़ जिल्ह्यातील शून्य ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित ७ लाख ७४ हजार ५५३ बालकांना पोलिओ लस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

नाशिक महापालिका क्षेत्रातील १ लाख ८६ हजार ८४५ पैकी १ लाख ४६ हजार ३८३ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. नाशिक ग्रामीणमधील ४ लाख १४ हजार ९६ बालकांपैकी ३ लाख ९३ हजार ५२१ बालकांना, नगरपालिका क्षेत्रातील ५१ हजार ३४९ पैकी ५१ हजार ८७८ बालकांना तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील १ लाख १९ हजार ३१९ बालकांपैकी ५२ हजार ३८७ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ पोलिओ लसीकरणासाठी जिल्ह्यात ४ हजार ४२९ बूथ उभारण्यात आले होते. सोमवारपासून तीन ते पाच दिवस ३ हजार ५२२ पथकांद्वारे उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत़

नगरपालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरणत्र्यंबकेश्वर - १८०४, इगतपुरी - ३२१६, भगूर - ११५६, देवळाली - ३८४४, सिन्नर - १०६१६, येवला - ७११९, नांदगाव - ४१४३, मनमाड - १११०१, सटाणा - ८८७९.

नाशिक महापालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरण

सातपूर ४२२४, संजीवनगर ५३१५, आर.सी.एच. केंद्र गंगापूर ८३०७, एमएचबी कॉलनी ४६६८, सिडको ४३८५, अंबड ४७५४, मोरवाडी ४९६३, कामटवाडे ३८८१, पवननगर ५००३, पिंपळगाव खांब ५३४९, नाशिकरोड ५५८०, विहितगाव ३८०५, सिन्नर फाटा ५०११, गोरेवाडी २७७५, दसक पंचक ४९७१, उपनगर ४८६८, बजरंगवाडी ४७२९, भारतनगर ४७५५, वडाळागाव ४१६४, जिजामाता ३८३३, मुलतानपुरा ४७२५, जिल्हा शासकीय रुग्णालय ७७५८, रामवाडी ३८७३, रेडक्रॉस ३७१४, मायको दवाखाना पंचवटी ४९८४, म्हसरूळ, मखमलाबाद ५०२६, तपोवन ४६२३, हिरावाडी ४८१०.

जिल्ह्यातील पोलिओ डोसची टक्केवारीबागलाण ९५, चांदवड ९४, देवळा १००, दिंडोरी ९६, इगतपुरी ९७, कळवण ९९, मालेगाव ९२, नाशिक ९८, नांदगाव ९३, निफाड ९३, पेठ ९०, सिन्नर ९६, सुरगाणा ८७, त्र्यंबकेश्वर ९४, येवला ९३, जिल्हा परिषदअंतर्गत : ९४, नगरपालिका क्षेत्र : १००़६३

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल