शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक एज्युकेशन सोसायटीसाठी दोन पॅनल रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:05 IST

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी दोन पॅनल रिंगणात असून, प्रचाराला वेग आला आहे. येत्या १७ रोजी होणाऱ्या  निवडणुकीत ६०० मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहेत.

ठळक मुद्दे११ जागांसाठी निवडणूकआरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी दोन पॅनल रिंगणात असून, प्रचाराला वेग आला आहे. येत्या १७ रोजी होणाऱ्या  निवडणुकीत ६०० मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहेत. दरम्यान, प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले असून, रात्री उशिरापर्यंत प्रचार केला जात आहे.अध्यक्षपदावर सूर्यकांत रहाळकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यवाह पदासाठी निवडणूक होत आहे. उपाध्यक्ष- २, कार्यकारिणी- ८ आणि कार्यवाह- १ अशा ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली रहाळकर पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून, प्रतिस्पर्धी एन. एस. हितकारी पॅनलनेही उमेदवार उभे केले आहेत.सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली दिलीप फडके आणि चंद्रशेखर मोंढे उपाध्यक्षपदासाठी रिंगणात असून, कार्यवाह पदासाठी रहाळकर पॅनलचे राजेंद्र निकम यांनी शशांक मदाने यांना आव्हान दिले आहे. तर कार्यकारी मंडळातून पांडुरंग अकोलकर, सरोजिनी तारापूरकर, चंद्रशेखर वाड, भास्कर कोठावदे, विनायक देशपांडे, रतनशेठ भट्टड, श्रीकृष्ण शिरोडे रिंगणात आहेत.हितकारी पॅनलचे सुहास अष्टपुत्रे आणि स्नेहमयी भिडे उपाध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. तर कार्यवाह म्हणून शशांक मदाने पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. कार्यकारी मंडळातून वैशाली कुलकर्णी, हेमंत जानवे, वीणा नवले, रेखा क्षीरसागर, स्नेहमयी भिडे, सुहास अष्टपुत्रे हे उमेदवारी करीत आहेत. पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी कर्मचाºयांनी मिळून एन. एस. हितकारी पॅनलची निर्मिती केली आहे. तर रहाळकर पॅनलने अनुभव तसेच संस्थेच्या कामात सक्रिय असलेले उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. दोन्ही पॅनलने प्रचाराला सुरुवात केली असून, रात्री उशिरापर्यंत प्रचार रंगत आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकSchoolशाळा