शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

नाशिक जिल्हा न्यायालयात कुरीयरद्वारे धान्य घोटाळ्यातील पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:22 IST

नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या वाडीव-हे रेशन धान्य घोटाळ्यातील बॉक्सभर पुरावे ठाणे येथून अज्ञात व्यक्तीने कुरीयरद्वारे नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले आहेत़

ठळक मुद्देवाडीव-हे रेशन धान्य घोटाळा : चौदा संशयित मास्टरमार्इंड जितूभाई ठक्कर फरारच

नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या वाडीव-हे रेशन धान्य घोटाळ्यातील बॉक्सभर पुरावे ठाणे येथून अज्ञात व्यक्तीने कुरीयरद्वारे नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले आहेत़ विशेष म्हणजे आठ दिवसांपुर्वी न्यायालयात कुरीयरद्वारे आलेला हा बॉक्स मंगळवारी (दि़२७) जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़एम़नंदेश्वर यांच्यासमोर न्यायालयात उघडण्यात आला असता त्यामध्ये रेशन धान्याचा काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ट्रकसोबत दिले जाणारे चलन,बील यांचे मूळ प्रती या बॉक्समध्ये आहेत़ दरम्यान, उपविभागीय अधिकारी तथा तपास अधिकारी अतुल झेंडे यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशान्वये हा कागदपत्रांचा बॉक्स सोपविण्यात आला आहे़

वाडीव-हे रेशन घोटाळ्यात सुमारे १४ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये अरुण घोरपडे, संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, जितेंद्र ठक्कर, पूनम होळकर, गुदामपाल संजय कचरू वामन, अश्विन जैन व प्रकाश शेवाळे यांचा समावेश आहे़ दरम्यान, या घोटाळ्यातील मास्टरमाइंड जितूभाई ठक्कर या ठाणेस्थित संशयितास ग्रामीण पोलीस अद्यापही पकडू शकलेले नाहीत़ तर, नाशिकचे पोलीस मला अटक वा माझा शोध घेऊ शकत नाही माझे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत अशी धमकीही जितूभाईने पोलिसांना दिली होती़

जिल्हा न्यायालयात कुरीअरद्वारे आलेल्या हा सुमारे ३५ किलो वजनाचा बॉक्स मंगळवारी उघडण्यात आला़ त्यामध्ये रेशनच्या धान्याची वाहतूक करणाºया ट्रकसाठी लागणारे चलन, बील याची मूळ कागदपत्रे आहेत़ मोरारजी भिकुलाल मंत्री या ट्रान्सपोर्ट व्यवसायिक व त्यांचा मॅनेजर संजय रामकृष्ण गडाख तसेच पटेल यांची या बॉक्समधील मूळ बिलांवर नावे आहेत़ दरम्यान, मोक्कान्वये दाखल या गुन्ह्यांत उच्च न्यायालयाने संशयित घोरपडे बंधूंसह काही संशयितांना जामीन दिलेला आहे़ दरम्यान, जिल्हा न्यायालयात कुरीअरद्वारे या धान्य घोटाळ्यातील पुरावे बॉक्समध्ये येण्याची ही दुसरी घटना आहे़राज्यातील सर्वात मोठा घोटाळानाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेला हा धान्य घोटाळा सर्वांत मोठा असून, राज्यात प्रथमच धान्य घोटाळ्यात मोक्कासारख्या कलमाचा वापर करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम ९ तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, यातील आठ जणांना मॅटकडून क्लिन चिट मिळाली. धान्य वाहतूक ठेकेदार, धान्य दुकानदार, पुरवठा खात्यातील अधिकाºयांची चौकशी करण्यात आली़ तसेच या गुन्ह्यात अ‍ॅड़ अजय मिसर यांनी सर्वात मोठे असे ५ हजार ७८६ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून यामध्ये १४ आरोपी, तर ६०२ साक्षीदार आहेत़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयPoliceपोलिस