शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

अंध विद्यार्थ्यांना ‘प्लेक्स टॉक’ मशीन वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 4:48 PM

नाशिक : अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाचे साधन ठरलेल्या ‘प्लेक्स टॉक’ या मशीन्सचे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील १६० विद्यार्थ्यांना विनामूल्य ...

ठळक मुद्देनॅब महाराष्ट्राचा उपक्रम : विविध जिल्ह्यांमधील १६० विद्यार्थी लाभार्थी

नाशिक: अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाचे साधन ठरलेल्या ‘प्लेक्स टॉक’ या मशीन्सचे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील १६० विद्यार्थ्यांना विनामूल्य वाटप करण्यात आले. नॅब महाराष्ट आणि एनआायव्हीएच डेहरादून भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.डॉ. भालचंद्र जयंती आणि दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून नॅब संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी लुई ब्रेल, हेलन केलर आणि डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महाराष्टतील विविध जिल्ह्यांमध्ये अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या गतिमान शिक्षणासाठी संस्थेचे महासचिव गोपी मयूर व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या हस्ते १६० विद्यार्थ्यांना प्लेक्स टॉक मशीनचे वाटप करण्यात आले. एकूण वाटप केलेल्या शैक्षणिक सामग्रीची किंमत १० लाख रुपये इतकी आहे.यावेळी महासचिव गोपी मयूर म्हणाले, शिक्षणाशिवाय कुणीही जीवनात सक्षम होत नाही. अंध विद्यार्थ्यांनी स्वत:ला कमी न लेखता सर्वसामान्यांच्या बरोबरीने जिद्दीने अभ्यास करून सर्वसामान्यांप्रमाणेच सक्षम व्हावे, असे आवाहन केले. सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार म्हणाले, अंधांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते. त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज असते. त्याची गरज नॅब महाराष्टÑाच्या वतीने पूर्ण केली जाते. शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी नॅब समन्वयाची भूमिका पार पाडत असल्याचेही ते म्हणाले. नाशिक, पुणे, बीड, औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, यवतमाळ, नंदुरबार, हिंगोली या जिल्ह्यांमधील लाभार्थी याप्रसंगी उपस्थित होते.प्रास्ताविक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनोद जाधव यांनी केले. आभार रत्नाकर गायकवाड यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र तरंगे यांनी मशीनबाबत महत्त्व विशद केले. कार्यक्रमासाठी वर्षा देशमुख, बिलाल मणियार, संदीप बागुल, दत्तात्रय गुळवे, अशोक साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी