शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीमालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच जणांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 9:44 PM

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील संजोत मेटल इंडस्ट्रीमध्ये कंपनीत सीटूची युनियन लागू करावी तसेच विविध मागण्यांसाठी संपावर असताना कंपनीमालक संतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यु़एम़नंदेश्वर यांनी शुक्रवारी (दि़२९) पाच वर्षे सक्तमजुरी, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़ २१ मार्च २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास ही घडना घडली या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात १६ कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सबळ पुरावे सादर केले होते़

ठळक मुद्देसातपूर औद्योगिक वसाहत : संजोत मेटल इंडस्ट्रीसीटू युनियनसह मागण्यांसाठी संप ; १६ कामगारांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील संजोत मेटल इंडस्ट्रीमध्ये कंपनीत सीटूची युनियन लागू करावी तसेच विविध मागण्यांसाठी संपावर असताना कंपनीमालक संतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यु़एम़नंदेश्वर यांनी शुक्रवारी (दि़२९) पाच वर्षे सक्तमजुरी, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली़ २१ मार्च २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास ही घडना घडली या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात १६ कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सबळ पुरावे सादर केले होते़

सातपूर औद्योगिक वसाहतीतील संजोत मेटल इंडस्ट्रीमध्ये आरोपी मधुकर दौलत कुंभार्डे, यशवंत हरी रोकडे, परेश दत्तात्रय सोनार, प्रशांत उर्फ परशराम मुन्नुस्वामी नायडू, विजय विश्राम उमाडे व लालमोहर रामजी यादव हे सीटू युनियनचे सभासद व कंपनीतील कायमस्वरुपी व कंत्राटी कामगार होते़ कंपनीत सीटूची युनियन लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी आरोपी १७ नोव्हेंबर २०११ पासून संपावर होते़ २१ मार्च २०१२ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कंपनीमालक संतोष हेगडे हे ज्योती सिरॅमिक कंपनीसमोरील रोडने कारमधून येत असताना दुचाकीवरील आरोपींनी त्यांना अडविले व कारमधून खाली खेचले़ यानंतर लोखंडी पाईप, लोखंडी गज, लाकडी स्टंपने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ या मारहाणीमध्ये हेगडे यांच्या दोन्ही पायाचे व डाव्या हाताचे हाड मोडले होते़ तसेच कारच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते़

सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपरे (सद्यस्थितीत नेमणूक नवी मुंबई) यांनी करून ३१ मे २०१२ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ न्यायाधीश नंदेश्वर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी साक्षीदाराची साक्ष तसेच सबळ पुरावे सादर केले़ या पुराव्यामुळे न्यायालयाने आरोपी मधुकर कुंभार्डे, यशवंत रोकडे, परेश सोनार, प्रशांत उर्फ परशराम नायडू, विजय उमाडे व लालमोहर यादव यांना भादंवि कलम ३२६ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़

दरम्यान,न्यायालयात गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने सातपूर पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पोलीस हवालदार पी़व्ही़पाटील, कोर्ट कर्मचारी महिला पोलीस नाईक पी़व्ही़अंबादे, पोलीस नाईक संतोष गोसावी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयCrimeगुन्हा