सराईत गुन्हेगाराने केली पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 20:38 IST2017-08-07T20:37:20+5:302017-08-07T20:38:27+5:30

nashik,cidco,police,criminal,attack | सराईत गुन्हेगाराने केली पोलिसांना मारहाण

सराईत गुन्हेगाराने केली पोलिसांना मारहाण

ठळक मुद्देकामटवाडा बस थांब्याजवळ हैदोससरकारी कामात अडथळा तसेच मारहाणीचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको :
कामटवाडा बस थांब्याजवळ हैदोस घालणाºया गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयिताने कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोघा पोलीस कर्मचाºयांना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मनोज मालोजी मोगल (रा़धन्वंतरी कॉलेजजवळ, इंद्रनगरी, कामटवाडा, नाशिक) असे मारहाण करणाºयाचे संशयिताचे नाव असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मनोज मोगल याचा कामटवाडा बसथांब्याच्या पाठिमागे हैदोस सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षास कळविली़ त्यांनी अंबड पोलीस ठाण्यास माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस शिपाई प्रशांत नागरे व संभाजी जाधव हे व्हॅन घेऊन घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी मोगल यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लिल शिवीगाळ सुरू करून मारहाण केली़ तसेच जाधव यांच्या हातातील वॉकीटॉकी घेऊन जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले तर नागरे यांच्या शर्टाचे बटन तोडले़
पोलीस कर्मचारी नागरे व जाधव यांनी मोगलवर ताबा मिळवत अटक करून अंबड पोलीस ठाण्यात आणले़ या ठिकाणी आणल्यानंतर आरडाओरड तसेच संभाजी जाधव यांना मारहाण करून जखमी केले़ पोलिसांनी सोमवारी (दि़७) नागरे यास न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़

Web Title: nashik,cidco,police,criminal,attack