अवघ्या एका मिनिटाने हुकली संजीवनीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:21 PM2018-03-08T16:21:47+5:302018-03-08T16:21:47+5:30

एप्रिल महिन्यात आॅस्ट्रेलिया येथे होणाऱ्या  कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद करू न शकल्याने संजीवनी जाधव हिचे कॉमनवेल्थचे तिकीट हुकले आहे.

nashik,chance,dismise,justminute,comanwelth,game | अवघ्या एका मिनिटाने हुकली संजीवनीची संधी

अवघ्या एका मिनिटाने हुकली संजीवनीची संधी

Next
ठळक मुद्देउपविजेतेपद : कॉमनवेल्थचे स्वप्न अधुरेचसंजीवनीमध्ये काहीसे नैराश्य; निकालाने धक्का


नाशिक : एप्रिल महिन्यात आॅस्ट्रेलिया येथे होणाऱ्या  कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद करू न शकल्याने संजीवनी जाधव हिचे कॉमनवेल्थचे तिकीट हुकले आहे. पटीयाला येथील पात्रता फेरीत संजीवनीला अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी संजीवनीला विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. गेल्या वर्षभर अ‍ॅथेलेटिक्स आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणारी संजीवनी आॅलिम्पिकचेदेखील आशास्थान मानली जात होती.  मात्र  कॉमनवेल्थचे स्वप्न भंगल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.
पटीयाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन करंडक स्पर्धेतून कॉमनवेल्थसाठीची पात्रता स्पर्धा घेण्यात आली. या पात्रता फेरीतच संजीवनीला अवघ्या एक मिनिट काही सेंकंद अंतराने पराभवाला सामोरे जावे लागले. केरळच्या एल सूर्या हिने १० किलोमीटर स्पर्धेत ३२:२३.९६ वेळेची नोंद करीत प्रथम क्रमांक मिळविला शिवाय नवीन विक्रमही प्रस्थापित केला, तर संजीवनी जाधवने ३३:३६.४९ वेळेची नोंद करीत उपविजेतेपद मिळविले.
कॉमनवेल्थसाठी पात्रता फेरीत प्रथम क्रमांक मिळविणे अपेक्षित असल्याने संजीवनीने कसून सराव केला होता. यासाठी तिने पहिल्या दिवशी झालेल्या पाच किलोमीटर स्पर्धेतून माघारीही घेतली होती. तिने १० किलोमीटर स्पर्धेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. परंतु स्पर्धेच्या अखेरच्या चरणात तिला एल सूर्या हिला मागे टाकता आले नाही आणि अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने संजीवनीचे स्वप्न अधुरे राहिले. पात्रतेसाठीची अपेक्षित वेळ तिला नोंदविता आली नाही. असे असले तरी जागतिक विद्यापीठ स्पर्धेत संजीवनी पूर्वीप्रमाणेच उज्ज्वल कामगिरी करून भारतासाठी पदके प्राप्त करेल, असा विश्वास तिचे प्रशिक्षण वीजेंद्रसिंग यांनी व्यक्त केला आहे.
---कोट--
धक्कादायक आणि निराशाजनक
कॉमनवेल्थचे स्वप्न घेऊन मैदानावर घाम गाळणाºया संजीवनीला पात्रता स्पर्धेत पदक मिळाले असले तरी पात्रता मिळविता न आल्यामुळे संजीवनीमध्ये काहीसे नैराश्य आले आहे. या निकालामुळे नक्कीच धक्का बसला आहे. फिजिकल फिटनेस पूर्णपणे असताना आणि कॉमलवेल्थची पात्रता पूर्ण करेल, असा सर्वांनाच विश्वास असताना पात्रता फेरी पार करता न आल्याचे दु:ख आहे. पहिली आलेली मुलगी हेदेखील चांगली खेळाडू आहे. ती एशियन चॅम्पियन असली तरी संजीवनीही तितकीच तयारीत होती. या निकालाने धक्का बसला आहे.
- वीजेंद्रसिंग, प्रशिक्षक

Web Title: nashik,chance,dismise,justminute,comanwelth,game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.