शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरची नळी तोंडात धरून नाशिकमध्ये उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 16:51 IST

नाशिक : एलपीजी गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू करून गॅसची नळी तोंडात धरीत उद्योजकाच्या पंचवीस वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील दादाजी कोंडदेव नगरमध्ये घडली़ अजिंक्य उदय खरोटे (२५, रा. ७, रेखांकित, दादोजी कोंडदेवनगर, गंगापूर रोड, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़

ठळक मुद्देगॅसची नळी तोंडात धरीत आत्महत्या

नाशिक : एलपीजी गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू करून गॅसची नळी तोंडात धरीत उद्योजकाच्या पंचवीस वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील दादाजी कोंडदेव नगरमध्ये घडली़ अजिंक्य उदय खरोटे (२५, रा. ७, रेखांकित, दादोजी कोंडदेवनगर, गंगापूर रोड, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य हा रात्रीच्या सुमारास एकटाच घरी होता़ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्याने स्वयंपाकगृहातील गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू केले व नळी तोंडात धरून आत्महत्या केली़ या कालावधीत अजिंक्यचे वडील उदय खरोटे व आई हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते़ त्यांनी अजिंक्यच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र फोन लागला नाही़ काही वेळाने घरी परतल्यानंतर अजिंक्यने आत्महत्या केल्याचे दिसले़ त्यांनी तत्काळ त्यास उपचारासाठी गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषीत केले़

दरम्यान,अजिंक्यच्या आत्महत्येच कारण समजू शकले नसून गंगापूर पोलीस तपास करीत आहेत़ तसेच अजिंक्यला सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू करून गॅसची नळी तोंडात धरून आत्महत्येची कल्पना कोठून सुचली, त्यासाठी त्याने यूट्यूब वा गुगलवरून माहिती मिळविली का? याबाबत तपास केला जातो आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

रक्ताचे नमुने तपासणीसाठी

अजिंक्य खरोटे या युवकाच्या तोंडावाटे एपीजी गॅस हा तोंडावाटे शरीरातून फुफ्फुस व फुफ्फुसावाटे संपूर्ण शरीरात मिसळल्याने पॉयझनिंग होऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे़ न्यायवैद्यकीय तपासणीसाठी रक्ताचे नमुने ठेवण्यात आले असून त्याच्या तपासणीनंतर रक्तामध्ये गॅसचे प्रमाण किती होते वा मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत स्पष्ट होईल़- डॉ़ वैभव धुम, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, नाशिक 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू