शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 21:15 IST

समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अविष्कार’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन म्हैसेकर यांनी केले.

ठळक मुद्दे‘अविष्कार’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन पदवीपूर्व (युजी)चे १९९, पदव्युत्तर (पीजी)चे १०५ विध्यार्थी

नाशिक : समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अविष्कार’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन म्हैसेकर यांनी केले.यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागचे संचालक डॉॅ. संदीप गुंडरे, वैद्य श्रीराम सावरीकर, डॉ. तापस कुंडू, डॉ. प्रिती बजाज, डॉ. व्ही. आर. सोनांबेकर, डॉ. राहुल पाटील, डॉ. ज्योती दुबे, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. जया कुरुविल्ला, डॉ. मित्रा, डॉ. देवकर, डॉ. स्वप्नील शिवगुंडे, श्रीमती विद्या ठाकरे, डॉ. स्वप्नील तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कुलगुरू म्हैसेकर यांनी सांगितले की, समाजात असणाऱ्या समस्यांचा विचार करून त्याला उपयुक्त ठरणारे संशोधनाची कास विद्यार्थ्यांनी धरली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्त वाढीस लागावी, त्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या संशोधनास व्यासपीठ मिळावे तसेच केलेल्या संशोधनाला लोकमान्यता मिळावी असे विविध हेतू साध्य व्हावे यासाठी विद्यापीठाचे कुलपती यांच्या प्रेरणेने ‘अविष्कार’ संशोधन प्रकल्प आंतरविद्यापीठस्तरीय महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यावेळी प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय अविष्कार प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेत वाड्:मय, भाषा व ललितकला, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण ३२७ विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी)चे १९९, पदव्युत्तर (पीजी)चे १०५, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल., पीएच.डी) व शिक्षक (टिचर)चे २३ स्पर्धक सहभागी आहेत. अश प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. या संशोधन महोत्सवाकरीता संबंधित विषयातील परीक्षकांनी महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले. अविष्कार प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता विद्यापीठातील राजेश पाटील, श्रीमती सीमा नाटेकर, स्मिता करवल, दिनेश चव्हाण आदी  कर्मचार्यांनी  परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठeducationशैक्षणिक